ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र या संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी कवी जाफ़र आदमपूरकर
नांदेड :बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील युवा कवी, गीतकार व मुक्त पञकार जाफर आदमपूरकर यांची ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या चळवळीचे जिल्हा अध्यक्ष शेख निजाम गवंडगावकर यांच्या परवानगीने
नुकतेच त्यांना कवी, गीतकार व संगीतकार प्रा.संदीप भुरे यांच्या हस्ते नियुक्ती पञ दिलेले आहे.
ग्रामीण भागातील मुस्लिम मराठी कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्या अडी अडचणी दूर करणे आणि मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, ग्रामीण भागातील मुस्लिम युवकांना लिहिते व बोलके करणे, मुस्लिम युवकांची जडणघडण, आविष्कार व स्वतःला व्यक्त करण्यासाठी वैचारिक मानसिकता बनवणे इत्यादी ध्येय या चळवळीचे आहेत.
या चळवळीचे संस्थापक अध्यक्ष कवी शेख शफी बोल्डेकर तर मराठवाडा प्रमुख अॅड. हाशम पटेल आहेत. कवी जाफ़र आदमपूरकर सरांची महत्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे शेख युसूफ कंधारकर, डाॅ.जब्बार पटेल, सय्यद कुतुब, अय्युब नल्लामंदू आदींनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा