१८ सप्टेंबर २०१९

सरदार वल्लभभाई पटेल पुरस्काराने राजु पाटिल सन्मानित


बिलोली ता.प्र.
आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या व ब्रिक्स मानव अधिकार मिशन यांच्या वतिने देण्यात येणारा यंदाचा जाहिर सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार आज दि.१७ सप्टेंबर रोजी बिलोलीचे पञकार राजु पाटील याना लातुर येथे आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानव अधिकार मिशन यांच्या वतिने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा यंदाचा सरदार वल्लभभाई पटेल पुरस्काराने बिलोलीचे पञकार राजु पाटील शिंपाळकर याना आज दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन प्रविन मंगल कार्यालय लातुर येथे आयोजित कार्यक्रमात  मनोजकुमारजी तोमर-राष्ट्रिय अध्यक्ष भारतिय नरेंद्र मोदी संघ दिल्ली , प्रदिप पाटिल खंडापुरकर राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.भ्र.नि.स., डाँ.कविता रायजादा महिला राष्ट्रीय अध्यक्षा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित राजु पाटील यांना सन्मान पञ,स्मृती चिन्ह ,देऊन सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुर्वी ते महाराष्ट्र  ओबीसी फांउडेशनच्या वतिने महाराष्ट्र रत्न ,महात्मा कबिर समता परीषदेच्या वतिने नांदेड रत्न ,बिहार हिंदी विद्यापीठाकडुन पञकार शिरोमणी पुरस्कार,पद्मश्री डाँ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी पुरस्काराने तसेच  महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ,पञकार प्रेस परिषद ,दै.समिक्षा व क्रिएटिव्ह ग्रुप च्या वतिने विशेष पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.नुकताच सदरील पुरस्काराने सन्मानित  झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडुन त्यांच्यावर   अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...