बिलोली (सय्यद रियाज )बिलोली येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डिजिटल अभ्यासिका येथे अनेक पुस्तके व ग्रंथ भेट देऊन अनुप अंकुशकर
नगरसेवक यांनी सामाजिक बांधुलकी जपली यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्मान झाले असुन फुले शाहु आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्याचा काम हाती घेतल्याचं दिसुन येत आहे बिलोली शहरातील हा असा एकमेव उपक्रम संपुर्ण नांदेड जिल्हात आदर्श अभ्यासिका म्हणुन ओळखली जात आहे अनेक प्रकारचे पुस्तकांचा संच हा विद्यार्थांना जिवनदायी ठरणार आहे यावेळी अनुप अंकुशकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व उद्याचे कलेक्टर,वकील,इंजिनीअर होण्यासाठी शुभेच्छा दिले व अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे अाहे असे सांगितले मोबाईलचा वापर कमी करण्याचे संकेत ही यावेळी यांनी उपस्थितांना केले व बिलोली शहर हे दारू व तंबाखुपासुन व्यसनमुक्त व्हाव असं आवाहन समस्त तरूण,वयस्कर नागरीकांना केलं आणि अण्णाभाऊ साठे डिजिटल अभ्यासिकेचे सर्व सदस्य राजेश कुडके,अजय कुडके, सतिष कुडके, भरत कुडके , अविनाश चिल्लारे,राहुल वीर,विकास भालेराव, अंकुश कुडके,चंद्रकांत कुडके यांनी अनुप अंकुशकर, संतोष शेकापुरे यांचा सत्कार केला तर सुञसंचालन सामाजिक कार्यकर्ता मुकिंदर कुडके यांनी केले व आभार पञकार मारोती भदरगे यांनी मांडले याठिकाणी विद्यार्थांना मिठाई सुध्दा वाटप करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा