नांदेड - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पथनाट्य सादरीकरण करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बार्टी मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर समतादूतांमार्फत जातीयता निर्मूलन ,स्त्री-पुरुष समानता,या विषयावर पथनाट्य सादरीकरण 16 सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी व सर्व समतादूत प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद हायस्कुल ,ग्रामपंचायत ,निवासी शाळा ,माध्यमिक व उच्चं माध्यमिक विद्यालये ,महाविद्यालये इ.ठिकाणी पथनाट्य सादरीकरण करण्यात येत आहे .
स्त्री-पुरुष समानतेसाठी घरातील दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक असून त्याची सुरुवात घरापासून करावयाची असते व केवळ पुरुषांना विरोध केल्याने ही समानता होणार नसून त्यासाठी महिलांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलामुलींमध्ये भेद न करता समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने होईल असे वक्तव्य सौ.सुजाता पोहरे यांनी केले.
सदर पथनाट्याच्या माध्यमातून जातीयता निर्मूलन व स्त्री-पुरुष समानता या विषयावर समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम समतादूतांमार्फत केले जात आहे.ह्या साठी बार्टी चे महासंचालक मा.कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे ,व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा