हाॕटेल्स , दुकांने घरांतुनदारुची खुल्लमखुल्ला विक्री
माढा - ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मानेगांव येथे गेल्या अनेक दिवसांपासुन हाॕटेल्स , ढाबे दुकान आणि घरांतुन विनापरवाना होणा-या दारु विक्रीच्या विरोधात येथील महीला आक्रमक झाल्या असुन येथील दारु बंद न केल्यास या महीला बचत गटाच्या संचालिका प्रमोदीनी सुहास लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या पविञ्यात येथील महीला आहेत.संबंधित विभागाकडुन तात्काळ कार्यवाही झाली नसल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा येथील महीलांकडुन सामुहिक पणे माढा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आला आहे.
माढा तालुक्यातील मानेगावात हाॕटेल्स , दुकाने , ढाबे आणि अगदी घरांतुन दारुची बिनबोभाट विक्री गेल्या अनेक दिवसांपासुन होत आहे.सदरची दुकाने अगदी शाळेजवळच असल्याने दारुड्यांच्या ओरडण्याचा शालेय विद्यार्थ्यांसह या मार्गावरुन जाणा-या नागरीकांना याचा ञास होतो.हा प्रकार विद्यार्थ्यांवर विपरीत परीणाम करणारा आहे.या वातावरणामुळे अनेक युवक व्यसनाधीन झाले असुन या प्रकारामुळे संसार उध्वस्त झाल्याची येथील उदाहरणे आहेत.अनेकदा यासंबंधाने सांगुन देखील काही उपयोग झाला नाही. युवा पिढी वाममार्गाला लागण्यापुर्वी संभाव्य धोका टाळण्यासाठी येथील अवैध आणि विनापरवाना हाॕटेल्स , दुकाने आणि ढाबे आणि घरांतुन होणा-या दारुची विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी येथील बचत गटाच्या संचालिका प्रमोदीनी सुहास लांडगे यांनी माढा येथील राज्य उत्पादन शुल्क अधिका-यांकडे दि.14 आॕगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे केला आहे .यासंबधी संबंधित विभाग मुदतीत योग्य ती कार्यवाही केली नसल्यास समस्त बचत गटांच्या महीलांसह आंदोलन करण्याचा इशारा प्रमोदीनी सुहास लांडगे यांच्यासह नंदा नागनाथ लांडगे , अर्चना अमोल चिकणे , अंजना गोरख लांडगे , रेखा बापु शिंदे , नंदा काकासाहेब पारडे आदिं महीलांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा