बिलोली
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने माध्यमिक आश्रमशाळा दगडापूर येथे राजीव गांधी जयंती निमित्त सदभावना दिवस साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, सदभावना दिवस म्हणजेच समरसता दिवस व राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस असेही ओळखले जाते या निमित्ताने वृक्षारोपण विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून वृक्षारोपण करण्यात आले या वेळी नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, भारतात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस साजरा केला जातो. याला 'समरसता दिवस' आणि 'राजीव गाँधी अक्षय ऊर्जा दिवस' म्हणूनही ओळखले जाते. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ हा महत्त्वाचा दिवस साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती लक्षात ठेवण्यासाठी सद्भावना (इतरांसाठी चांगले विचार ठेवून) किंवा समरसता दिवस साजरा केला जातो. राजीव गांधी सरकारचे एकमेव ध्येय होते ते म्हणजे इतरांबद्दल चांगली भावना ठेवणे. भारतातील सर्व धर्मांमध्ये समरसता, राष्ट्रीय एकता, शांतता, प्रेम आणि आपुलकी वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
या दिवशी देशातील विविध राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दिवशी लोकं झाडे लावतात, झाडे जतन करतात, नैसर्गिक सौंदर्य वाचवतात, पर्यावरणाचे रक्षण करून तसेच नैसर्गिक स्त्रोतांचे रक्षण करून हा दिवस साजरा करतात. पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण समस्यांविषयी लोकांना जाणीव करुन देऊन हा दिवस साजरा केला जातो.
राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी सद्भावना दिवस साजरा केला जातो, ज्यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या देशासाठी केलेल्या अनेक सामाजिक आणि आर्थिक कामांतून भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची दृष्टी स्पष्टपणे पाहिली जाऊ शकते. त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या विकासासाठी दिलेल्या भाषणांतील उत्साही व प्रेरणादायक शब्द कायम लक्षात राहतात. त्यांचे शब्द खूप प्रेरणादायक होते जे अजूनही देशातील तरुणांना भारताचे नेतृत्व करण्यास प्रेरणा देते. भारत एक पुराना देश है, लेकिन एक जवाँ राष्ट्र है; जैसा कि हर जगह युवा की तरह, हम आतुर है। मैं जवान हूँ और मैंने भी एक सपना देखा है। मैंने एक ऐसे भारत का सपना देखा है जो शक्तीशाली हो, स्वतंत्र हो, आत्मनिर्भर हो, और मानवता की सेवा में दुनिया के सभी राष्ट्रों में अग्रणी हो।”या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सदभावना दिवस प्रतिज्ञा चे सामूहिक वाचन करण्यात आले
मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतोकी, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गानी सोडवीन"
या दिवशी देशातील विविध राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दिवशी लोकं झाडे लावतात, झाडे जतन करतात, नैसर्गिक सौंदर्य वाचवतात, पर्यावरणाचे रक्षण करून तसेच नैसर्गिक स्त्रोतांचे रक्षण करून हा दिवस साजरा करतात. पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण समस्यांविषयी लोकांना जाणीव करुन देऊन हा दिवस साजरा केला जातो. याच उद्देशाने आज आम्ही या शाळेत वृक्षारोपण करत आहोत असे मत मांडले
यावेळी सदर कर्यक्रमाचे सुत्रसंचलन बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी केले व नांदेड चे समतादूत विनोद पाचंगे व बिलोली न.प.चे नगरसेवक जावेद कुरेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण विषयी मार्गदर्शन मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रम साठी शाळेचे सहशिक्षक यु.एल.वगशेट्टे , आर.डी.शिंदे ,पी.एम.शिंदे व सौ.कारकले यांनी परिश्रम घेतले .सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक मा.कैलास कणसे व बार्टी चे मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे यांनी मार्गदर्शन करत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा