कुंडलवाडी प्रतिनिधी
दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पोलीस स्टेशन कुंडलवाडी तर्फे स्त्रियांच्या सन्मानार्थ, महिलांच्या सबलीकरणार्थ तसेच जनजागृतीसाठी विशेष नारीशक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीची सुरूवात कुंडलवाडी पोलीस ठाण्यातून होणार असुन येथून दस्तगीर चौक,चौक,नवरंग जवळ पथनाट्य होणार येथून जोड मारुती चौक,कुंडलेश्वर मंदिर येथे पथनाट्य,राम मंदिर पासुन बँक ऑफ बडोदा,डाॅ.हेडगेवार चौक येथे पथनाट्य सादर होणार येथून नगरपरिषदेत रॅलीचे समारोप होणार आहे.
या रॅलीत सौ.अर्चना पाटील मॅडम अपर पोलीस अधीक्षक, भोकर,सौ. क्रांती डोंबे मॅडम उपविभागीय अधिकारी, बिलोली,श्री.दशरथ पाटील सर उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.या रॅलीत महिला दक्षता समितीचे पदाधिकारी सदस्य तसेच शहरातील शालेय विध्यार्थीनी महिला शिक्षिका आदींसह शहरातील मोठ्याप्रमाणात महिलांचा सहभाग लाभणार आहे.सदर नारीशक्ती रॅली ही प्रबोधनात्मक व जनजागृतीपर असून, समाजात महिलांच्या सन्मानाबाबत सकारात्मक संदेश देणारी ठरणार आहे.तरी रॅलीत शहरातील मोठ्याप्रमाणात महिला व विध्यार्थीनी
उपस्थित राहावे.असे आवाहन कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांच्यावतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा