२० सप्टेंबर २०२५

स्वस्थ नारी, सशक्त परिवार " अभियान अंतर्गत मालेगाव येथे कार्यक्रम संपन्न

 " 



नांदेड :- तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे आज दिनांक २० सप्टेंबर रोजी

"स्वस्थ नारी सशक्त परिवार" प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मौजे मालेगाव येथील लोकप्रतिनिधींच्या  हस्ते स्त्री शक्तीचे प्रतीक राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

आज रोजी आयोजित करण्यात आलेल्या " स्वस्थ नारी सशक्त परिवार " या अभियानामध्ये मालेगाव व परिसरातील गृहिणी, विद्यार्थिनी, गरोदर माता, वयस्क महिला या सर्व गटातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या प्रसंगी लाभार्थ्यांना स्त्रीरोग विशेषज्ञ , अस्थिरोग विशेषज्ञ, दंतशल्य चिकित्सा, क्षयरोग तपासणी, प्रयोग शाळेतील इतर रक्त तपासण्या इत्यादी वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या.  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अर्धापूर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. बोकारे मॅडम, अस्थिरोग तज्ञ डॉ. मोरे सर, दंतशल्यचिकित्सक डॉ.मोरे सर, डॉ. श्याम सावंत सर व डॉ.रोहिणी जाधव मॅडम यांच्या चमूने उपस्थित लााभार्थ्यांना आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण प्रदान केले. उपरोक्त अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. शाम सावंत व डॉ जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनात  डॉ गवळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक अरुण गादगे,  मोरडे पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजकुमार इंगळे, सोनवणे,चौधरी,अजय देवकरे, एस. बंडे,शिरसाट ताई, निकिता अच्युते, आरोग्य कर्मचारी संदीप मांजरमकर, श्रीकांत कछवे, पवार, इंगोले, चव्हाण ताई,संगीता गिराम, गुंडले, अनिता कोटमवाड, बोलकर, भाले, गंगातीरे मामा, जब्बार भाई, वाहन चालक सूर्यवंशी मामा, सर्व आशा ताई समस्त कर्मचाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...