पोलिस आणि दक्षता समितीचा समुपदेशाने महिलेचे मन परिवर्तन.
कुंडलवाडी प्रतिनिधी
कुंडलवाडी पोलिस ठाणे हद्दीतील अर्जापुर येथील एका ४५ वर्षीय महिला शेळगाव (थडी) गोदावरी नदीवरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेली असताना यासंदर्भात माहिती प्रथमदर्शी नागरीकांनी पोलिसांना दिली.माहिती मिळताच सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांनी सबंधीत ठिकाणी पोहचून वाचविले महिले प्राण.
हि घटना दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली आहे. कुंडलवाडी पोलीस व महिला दक्षता समितीने महिलेची समजुत घालून त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन केले.
कुंडलवाडी पोलिस ठाणे हद्दीतील असलेल्या अर्जापुर गावातील पंचशीला लालू कांबळे (४५ वर्ष) हि महिला आपल्या २ मुली व एक मुला सोबत राहते.नवरा मयत आहे.दि.२७ सप्टेंबर रोजी कौटुंबिक वादातून महिला शेळगाव (थडी) जवळील गोदावरी नदीवरून उडी मारून जीव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तेथून जात असलेल्या लोकांनी नदीच्या पुलावर महिला दिसल्याने महिलेकडे विचारपूस केली.महिलेने मला जगायच नाही. मला आत्महत्या करायची आहे. असे उत्तर दिल्याने काही लोकांनी हि बाब कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना दिली.तात्काळ शेळगाव (थडी) येथे सपोनि.शिंदे पोहचून महिलेस आत्महत्या करण्यापासून प्रावृत केले.
तेथून महिलेस पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे,महिला पोलिस कर्मचारी अरूणा श्रीवास्तव,महिला दक्षता समितीचे अध्यक्षा संगीता मेरगेवार,उपाध्यक्षा ज्योती लाडे,अनुराधा कांबळे,स्मिता दाचावार,अंजूषा दाचावार यांनी समुपदेशन करून महिलेस तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. कुंडलवाडी पोलीसांनी आत्महत्या करण्यास निघालेल्या महिलेचा जीव वाचविले. पोलिस आणि दक्षता समिती चा समुपदेश महत्वाचा ठरला.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे आणि दक्षता समितीने
केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा