कुंडलवाडीत एकाच परिवारातील पाच पाॅझिटिव्ह
कुंडलवाडी (मोहम्मद अफजल )
दि.4 सप्टेंबर व 5 सप्टेंबर या दोनवदिवसात कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कुंडलवाडी,हुनगुंदा, टाकळी,सावळी,हरनाळी आदी गावातील एकुत 53 व्यक्ती मधून 50 व्यक्तींचे अॅन्टीजेंट चाचणी करण्यात आले.त्यापैकी 7 रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.तसेच यातील 3 रूग्णांची कोविड सेंटर येथे थोड स्वाॅब घेण्यात आले.त्यापैकी तीन रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.या दोन दिवसात घेतलेल्या कोविड 19 तपासणीत कुंडलवाडी येथील एकाच परिवारातील 5 व्यक्तींचा समावेश आहे.तसेच शहरातील एक टाकळी एक,हरनाळी एक,सावळी दोन व्यक्ती पाॅझिटिव्ह निघाले.यातील हरनाळी येथील एक रूग्ण गंभीर असल्याचे आढळून आल्याने त्यांना कोविड सेंटर बिलोली येथून नांदेड येथील कोविड सेंटर येथे भरती करण्यात आले आहे.
अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांनी सांगितले.
________________________
कुंडलवाडी शहरातील व ग्रामीण भागातील जनतेने आपल्या घरातील वडिलधा-या मंडळीची विशेष काळजी घ्यावे.तसेच नागरीकांनी कोविड 19 नियमाचे काटेकोर पणे पालन करावे.जवळचा तालूकात रूग्णसंख्या अती वाढल्याने जनतेने दैनंदिन व्यवहारात शक्यतो तालूक्याचा संपर्क टाळावा.असे अहवान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा