कुंडलवाडी ते पिंपळगाव डांबरीकरण रस्ता दुरूस्तीचे गेल्या ६ ते ७ महिन्यापासून रखडलेले काम त्वरीत सुरू करा- अभिजीत पाटील धरमुरे पिंपळगांवकर यांची मागणी
कुंडलवाडी ते पिंपळगांव या रस्त्याच्या डांबरीकरण दुरूस्तीचे काम मागील ६ ते ७ महिन्यापुर्वी सुरूवात करण्यात आले. पण गुत्तेदाराने (कंत्राटदाराने) कामास सुरूवात केल्यानंतर अचानक काही दिवसात दुरूस्तीचे काम बंद केले व ते काम आजतागायत पुर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे अगोदरच खड्डेमय असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरअवस्था झाली आहे. याचा कुंडलवाडी ते पिंपळगांव रस्त्यांने रहदारी करणाऱ्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मा. उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले संबंधीत गुत्तेदारास आदेश देवून दुरूस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. किंवा त्या गुत्तेदारावर योग्यती कार्यवाही करावी. व तसेच या रस्त्याचे दुरूस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. अन्यथा तीव्र उपोषण करण्यात येईल. असा ईशारायुवासेना, तालुका सरचिटणीस
अभिजीत पाटील धरमुरे पिंपळगांवकर यांनी दिले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा