कुंडलवाडी (मोहम्मदअफजल) येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप तालूका उपाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर भंडारे याच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजनेंतर्गत शस्त्रक्रिया झालेल्या 15 महिला रूग्ण व त्यांचे नातेवाईक व आरोग्य कर्मचारी असे एकंदरीत 50 व्यक्तीना दि.6 सप्टेंबर रोजी सकाळी शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करीत अल्पउपहार नाशट्याची व चाहाची व्यवस्था करण्यात आले.
यापुर्वी लाॅकडाउन काळात स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण गंगाधर भंडारे,सचिव नरीता लक्ष्मण भंडारे रूग्णांचा वतीने अल्पउपहार,नाशट्याची व्यवस्था करण्यात आले होते.यावेळी शहर परिसरातील रूग्णांना डाॅ.बालाजी सातमवाड तन,मन,धनाने आरोग्य सेवा देत असल्यामुळे भाजप तालूका उपाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर भंडारे याच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
एकंदरीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासन निर्देशानुसार वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड प्रत्येक आठवड्यातील दर शनिवारी राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजनेंतर्गत शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करता कुंडलवाडी शहर व पाच उपकेंद्रातील रूग्ण दर शुक्रवारी रूग्णालयात दाखल होतात व शनिवार रूग्णांवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात येते.रूग्णांना शासनाचा प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी डाॅ.सातमवाड प्रयत्नशील राहतात म्हणूनच बिलोली,धर्माबाद,देगलूर,
नायगाव तालूक्यासह तेलंगणा राज्यातील रूग्ण डाॅ.बालाजी सातमवाड यांच्याकडे उपाचार घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शोधत येतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा