नांदेड:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके हे काल दुपारी 1 वाजता नांदेड वरून नायगाव कडे जात असताना तुपा पाटी शेजारी ऑटोचा अपघात होऊन ऑटो चालक त्याची पत्नी व लहान पाच वर्षांचा मुलगा जखमी अवस्थेत पडले ते पाहून त्यानी ड्रायव्हरला गाडी वळवून घेयायला लावली आणि त्या सर्व अपघातग्रस्थाना स्वतःच्या गाडीत घेऊन सरकारी दवाखान्यात नेऊन दाखल करून तातडीची मदत मिळवून दिल्याने साळुंकेचे सोशल मीडियातून कौतुक होताना दिसून येत आहे. रोड अपघात हे रस्त्यावर नेहमीच होत असतात त्या अपघातग्रस्तांना पहिल्यांदा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करणे हे अत्यंत गरजेचे असते त्यात ॲम्बुलन्स किंवा पोलीस मदतीला येण्यासाठी काही वेळ लागतो तोच वेळ हा अपघातग्रस्तांसाठी जीवनमरणाचा वेळ असतो मात्र पोलिस चौकशीत साक्षीदार बनवण्याच्या भीतीने अपघातग्रस्ततास पोलिस किंवा अंबूलस येईपर्यंत कोणी दवाखान्यात नेण्याचे धाडस करत नाहीत मात्र काही राजकीय पुढारी समाजसेवक ,कार्यकर्ते हे अपघात ग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावत असतात अशीच मदत प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके हे अनेक वेळा करताना दिसून येतात त्यांच्या कार्याची सोशल मीडियातून अनेकानी कौतुकही केलेले आहे त्यास त्यांनी मी माझं कौतुक होण्यासाठी नाही तर अपघातग्रस्तांना इतर लोकांनीही मदतीचा हात पुढे केला पाहिजे यासाठी सोशल मीडियातून संदेश देत असल्याचेही अनेकदा त्यांनी कमेंट्स मधून भावना व्यक्त केल्या आहेत
नांदेड नरसी रोडवर तुपा पाटी शेजारी ऑटो पलटी होऊन घडला अपघातात ऑटोचालक त्यांची पत्नी व पाच वर्षाचा मुलगा जखमी अवस्थेत पडले होते त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी अंबुलन्स ला जमलेले लोक फोन करत असताना त्यावेळी साळुंकेनी नायगाव कडे जाणारी आपली गाडी ड्रायव्हरला दवाखान्याकडे वळवायला लावून त्या सर्वांना गाडीतून दवाखान्यात नेऊन उपचार चालू करावयास लावून आपल्या कामासाठी रवाना झाल्याचे फोटो सोशल मीडियातून शेअर केल्याने त्यांच्या त्या कार्याचे सोशल मीडियातून कौतुक होताना दिसून येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा