कुंडलवाडी प्रतिनिधी(मोहम्मद अफजल)
शहरातील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार मुलीच्या माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.14 टक्के लागला असून यंदाही विद्यालयातील यशाची परंपरा कायम राखून विद्यालयातून कु.शेख रूही बाबा 81.8% टक्के गुण घेऊन विद्यालयातून सर्व प्रथम येण्याचा बहूमान मिळवीली,कु.जामदार पुजा राजेंद्र 81.6% टक्के गुण घेऊन सर्व द्वितीय आली.तर कु. जजगेकर लक्ष्मी खाकोजी 79.2% घेऊन विद्यालयातून सर्व तृतीय आली.विद्यालयातून दहावी बोर्ड परिक्षेत 35 विद्यार्थ्यां परिक्षा दिले तर यातून 34 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्यासह : 07,प्रथम श्रेणी : 12,द्वितीय श्रेणी : 10,उत्तीर्ण श्रेणी 05 त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव सब्बनवार,सचिव डॉ.प्रशांत सब्बनवार,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक साईनाथ बाभळीकर तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नागनाथ मारोतीराव चटलूरे आणि शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा