*उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात.
*सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचा स्तुतीतुल्य उपक्रम
कुंडलवाडी प्रतिनिधी
पोलीस ठाणे कुंडलवाडी आणि महिला दक्षता समितीचा वतीने स्त्रियांच्या सन्मानार्थ,महिला सबलीकरणार्थ तसेच महिला जनजागृतीसाठी,समाजामध्ये महिलांना मानसन्मान वाढण्यासाठी तसेच पोलिस ठाणे हद्दीतील महिला निसंकोचपणे आपल्या आडचणी
पोलिसांना किंवा महिला दक्षता समितीला सांगावे
त्यानिमित्ताने दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११=०० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून
नारीशक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.नारीशक्ती रॅलीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले.
उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते
हिरवाझेंडा दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान,तलाठी पवन ठकरोड,वैद्यकीय अधिकारी डाॅ.अनमुलवाड सारीका,मा.नगराध्यक्ष सुनील बेजगमवार,सोसायटीचे माजी.चेअरमन साईनाथ उत्तरवार,डाॅ.प्रशांत सब्बनवार,सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे,महिला दक्षता समितीचे पदाधिकारी पत्रकार आदी उपस्थित होते.
रॅलित अनेक ठिकाणी के.रामलू पब्लिक स्कूल चा विद्यार्थ्यांनी पहिली महिला डाॅक्टर डाॅ.आनंदीबाई जोशी यांच्या जिवनीवर लघु नाट्य सादर केले.तसेच कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार माध्यमिक विद्यालयाची विध्यार्थीनी कु.आरती मोकळे यांनी महिला शक्तीपर आपले विचार मांडले.तसेच कुंडलेश्वर मंदिर येथे हभप.कानोपात्रा ताई यांनी महिलांचा सन्मानार्थ आपले विचार मांडले.
वैद्यकीय अधिकारी डाॅ.अनमुलवाड सारीका यांनी
आरोग्य विभागाचा वतीने राबविण्यात येत असलेल्या"स्वस्थ नारी-सशस्त परीवार"अभियांचा लाभ उपस्थित महिलांनी घ्यावे.असे आवाहन केले.
मा.नगराध्यक्ष सुनील बेजगमवार,सोसायटीचे माजी.चेअरमन साईनाथ उत्तरवार,डाॅ.प्रशांत सब्बनवार,आदींनी सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे व महिला दक्षता समितीचा वतीने महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा उद्देशाने शहलात प्रथमच काढण्यात आलेल्या नारीशक्ती रॅली बद्दल सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचे कौतुक केले.यावेळी दक्षता समितीचे उपाध्यक्ष
सौ.ज्योती लाडे म्हणाले दक्षता समितीचा माध्यमातून पोलिसांचा मदतीने नक्कीच महिलाना न्याय मिळवुन देण्यात येईल असे अश्वासन दिले.
तसेच यावेळी सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले,महिलांवर अन्याय अत्याचार होत असेल तर ते सहन न करता ११२,१०९१ या पोलिस मदत क्रमांकाशी संपर्क करावे.असे आवाहन केले.
रॅलीत समाजिक कार्यकर्ते जेष्ठ मा.नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्या वतीने बिस्कीट व पाणी वापट करण्यात आले.तसेच विश्वनाथ दाचावार,गंगाप्रसाद गंगोणे,महेश तांडूलवार यांच्यावतीने पाणी वाटप करण्यात आले.रॅलीत दक्षता समितीचे अध्यक्ष संगीता मेरगेवार, उपाध्यक्षपदी ज्योती लाडे,अनुराधा कांबळे डाॅ.लीला लखमपूरे,अर्चना पोतनकर,रोहिणी गुंडाळे,सिमा कत्तुवार,शेख शबाना बेगम मोहम्मद अफजल,स्मिता दाचावार,सारिका सब्बनवार,अंजुषा दाचावार,रेखा कुंडलवाडीकर, मीना कोनेरवार, कमल जिठावार,गायत्री तुंगेनवार,संध्या माहेवार,सावित्रा समेटवार,अंशूमती उत्तरवार आदींसह शहरातील पत्रकार,प्रतिष्ठीत नागरीक,महिला,जिल्हा परिषद हायस्कूल,कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालय,माध्यमिक ऊर्दू विद्यालय,के.रामलू पब्लिक स्कूल,संत गोरोबा विद्यालय आदी शाळेचे विध्यार्थी शिक्षिका,पोलिस कर्मचारी,पोलिस पाटील मोठ्यासंख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ.नरेश बोधनकर,संतोष पाटील शिवशट्टे यांनी केले. सांगता सामुहिक राष्ट्रगीत पठण करून करण्यात आले.उपस्थीतांचे आभार पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा