०६ ऑक्टोबर २०२५

भारतीय जनता पक्षावतीने नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार डॉ कुडमुलवार



"यह पब्लिक है सब जानती है."

कुंडलवाडी प्रतिनिधी

कुंडलवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ साठी दि.6 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील 

मंत्रालयात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नूक्तेच जाहिर झाले.नगराध्यक्ष पद सर्वसाधारण  प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले.

नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताचा नगराध्यक्ष पदाचा मिच दावेदार म्हणून स्वताहून काहीजण बोलत आहे.खरे नगराध्यक्ष पदाचे दावेदार माजी न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार हेच आहे.अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे.कारण "यह पब्लिक है सब जानती है."

*डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार — जनतेच्या मनातील नेता, भाजपाचे प्रबळ नगराध्यक्ष पदाचे पुन्हा एकदा दावेदार*

विकास आणि माणुसकीचा संगम म्हणजे डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला गती दिली. घरकुल योजना, रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, स्वच्छता मोहिम,वृक्षारोपण,आणि नगरपालिकेच्या उत्पन्नवाढीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना थेट संपर्क, तत्काळ निर्णय आणि पारदर्शक प्रशासनाचा अनुभव मिळाला. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सतत योगदान दिलं. विद्यार्थ्यांना मदत, दिव्यांगांना सहाय्य आणि वाद मिटवण्यात त्यांनी मानवतेचा आदर्श निर्माण केला.

भारतीय जनता पक्षाचं कमळ कुंडलवाडीत फुलवणारे दुसरे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.

जनतेचा विश्वास आणि विकासाची दृष्टी यामुळे आजही लोक अभिमानाने म्हणतात.

*“ हृदयावर राज्य करणारे नेता म्हणजे डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार.”*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...