• नाशीक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन
•नांदेड जिल्हातील महसुल कामकाजावर परिणाम
बिलोली:-
सर्व कामे महसुल कर्मचा-यासारखी करायची आणी वेतन मात्र,मानधन देणार हे आता चालणार नाही असा ईशारा देत कोतवालाना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या अशी मागणी केली आहे.महाराष्ट्र कोतवाल संघटनेच्या वतीने नाशीक आयुक्तालय येथे दि.१९/११/२०१८ पासुन बेमुदत कामबंद आंदोलन चालु आहे.
तसेच नांदेड जिल्हा कोतवाल संघटेनेच्या वतीने सदरील आदोलनात सामील होण्याकरीता मा.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना निवेदन जिल्हाकार्यकारीनी तर्फे देण्यात आलेले आहे त्यात बिलोली तालुक्यातील कोतवालाचा सहभाग आहे.त्यास अनेक संघटनेनी पाठीबा दिला आहे. कामबंद मुळे बिलोली तालुक्यातील महसुल कामकाजावर परीणाम दिसुन येतो आहे.
कोतवालाना चतुर्थ श्रेणीची मागणी गेल्या ५० वर्षापासुन चालु असुन कोतवालावर अन्याय होत आल्याचे कोतवालातर्फे सांगण्यात येते.शासन स्तरावर चतुर्थश्रेणी बाबत फाईल पडुन असुन त्यावर कोणताही विचार केला गेला नाही.कोतवाल हे अस्थाई पद असुन त्यांना केवळ ५०००/- मानधन व १० रु चप्पल भत्ता मिळतो त्यांना शिपाई, आपरेटर, निवडुकीची सर्व कामे तहसिल पहारेकरी, सफाईकामगार ते अगदी गौणखनिज गुप्तहेर अशी जोखीमीची २४ तास कामे विना मोबदला करुन घेतली जातात.५०१०/- रु येवढ्याश्या तुटपुंजा मानधनावर २४ मानसिक व शारीरीक शोषण केले जाते. सामान्याच्या चहा टपरी वरील नोकराना सुध्दा १०,०००/- पगार असतो पण त्याच्या पेक्षाही कमी मानधनामुळे अशा या आधूनिक मागास अशी कोतवालाची अवस्था झालीआहे. सर्व सामान्य जनतेकडुन कोतवालाना चतुर्थ श्रेणी द्दिली जावी अशी मागणी जोर धरत आहे.गेल्या२०-२५ दिवसापासुन कोतवाल आपल्या संसारासह नाशीक येथे आंदोलन करीत आहेत.
चांगली बातमी
उत्तर द्याहटवा