नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर यांच्या 'हे लंबोदरा तू आल्यांवर' या गणपती गीताचे ख्यातनाम सिनेतारका वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते 'दामाजी एक्स्प्रेस' मंगळवेढा येथे विमोचन करण्यात आले.
या गीताचे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार विशाल पाटील, सह दिग्दर्शक अमोल वाघमारे, ध्वनिमुद्रक प्रकाश माने (मुंबई) व हिंदी टिञपटाचे संगीतकार प्रशांत सिंग(मुंबई)यांचे या गीताला संगीत संयोजन लाभले आहे. गायक सिद्धार्थ गजघाटे यांनी गायिले आहे.
'हे लंबोदरा तू आल्यांवर' हे गणपती गीत सर्व रसिक मिञांना नक्की आवडेल. याबद्दल माजी उपसरपंच व पञकार काशिनाथ वाघमारे, कवी,गीतकार जाफर आदमपूरकर, पञकार रियाज शेख, रमाकांत महाराज, सुरेश जाधव, संजय जाधव, दिलीप भुरे, गोपाळ म्हेञे, प्रा. बाबुराव उप्पलवार, प्राचार्य मारोती पिन्नरवार, प्रा. खुशाल उप्पलवार, प्रा. सुनिल भुरे, महायान सावळे, आदिंनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
संदीप भुरेजि आपलं खूप खूप अभिनंदन
उत्तर द्याहटवाSuper
उत्तर द्याहटवासर जी खूप खूप अभिनंदन
उत्तर द्याहटवा