नायगाव प्रतिनीधी :
आगामी विधानसभा निवडुका अगदी जवळ येऊन ठेपल्याने नायगाव विधानसभेचे टिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच चालू असून प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपपल्या परिने टिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार यांनी माञ प्रचारामध्ये मोठी मुसंडी मारली असून सध्यातरी बच्चेवार यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
नायगाव विधानसभेचे भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे जवळचे विश्वासू मानले जातात नायगाव विधानसभेसाठी आयत्या पिठावर रांगोळी काढण्यासाठी काही इच्छुक उमेदवार अचानकपणे निवडनूकीच्या समोर येऊन पक्षासाठी कोणतेच योगदान नसताना पैशाच्या जोरावर राजकारण करू पाहत आहे परंतू बालाजी बच्चेवार यांचे पक्षासाठी केलेले योगदान पाहता जनताच आता त्यांच्या पाठीमागे असल्याचे दिसून येत आहे तर काहिंनी तर बच्चेवार यांनाच विधानसभेचे टिकिट मिळावे यासाठी सोशल मिडियावर प्रचार करताना दिसत आहे विशेष म्हणजे बच्चेवार यांचा मागील राजकीय कार्यकाळ पाहिला तर तो खडतरच होता परंतु त्यांनी न डगमगता आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षासाठी कार्य चालूच ठेवले परंतू मध्येच काही इच्छुकांनी घूसखोरी करून पैशाच्या जोरावर नायगाव विधानसभेवर दावा करत आहे असे जरी असले तरी जनतेच्या मनात बच्चेवार या भागाचे आमदार व्हावे असे वाटत आहे बच्चेवार आमदार झाल्याशिवाय या भागाचा विकास होऊ शकत नाही आणि विकास करण्याची धमक फक्त बालाजी बच्चेवार यांच्यामध्येच आहे असेही काहि तालुक्यातील राजकीय जानकरांचे मत आहे बच्चेवार यांची लोकप्रियता पाहता लोकांमध्ये त्यांची चांगलीच लोकप्रियता वाढली असून वेगवेगळे उपक्रम व सोशल मिडियाच्या माध्यमातुन प्रचारामध्येही त्यांनी मोठी मुसंडी मारली असून सध्यातरी इतर इच्छुकांपेक्षा त्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा