जि प सदस्य बेळगे यांनी रंग- रंगोटीसाठी दोन लक्ष देणार
बिलोली
येथील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेची झालेली दुरावस्था पाहता या शाळेत विद्यार्थी संख्या वाढीसाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले.
ते दि.२४ जुन रोजी बिलोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेस दिलेल्या भेटी दरम्यान बोलत होते.या भेटी दरम्यान शिक्षण अधिकारी दिग्रसकर यांनी शाळेची दैनंदिन माहिती घेतली. यावेळी प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांच्या विषयी सांगताना म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वीच सर्व प्रतिनियुक्त्या रद्द केले असतानायेथील शिक्षक प्रतिनियुक्तीवर कसे हा सवाल उपस्थित केला ,? संबंधित शिक्षकांना शाळेवर त्वरित हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. ते पुढे म्हणाले की येथे हे गुणवत्तेची नाही तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची ची आणि त्यांना टिकवण्याची ची काळजी घ्यायला हवी. या शाळेच्या योग्य वाटचाल याविषयी समाधान व्यक्त करत ते म्हणाले की या शाळेच्या ऊर्जितावस्थेत साठी सर्वांनी किमान दोन महिने येथे राहून अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. येथील अडचणीबाबत आणि सोयी सुविधा याबाबत थेट माझ्याशी संपर्क साधून काम पूर्णत्वाला नेण्याच्या बावी प्रगट केल्या. .यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय बेळगे यांनी या शाळेच्या डागडूज्जी आणि रंगरंगोटी यासाठी येत्या दोन महिन्याच्या आत दोन लाख रूपये निधी देण्याची तयारी दर्शवली. ते पुढे म्हणाले की या शाळेसाठी मी तन मन आणि धन यासह सोबत आहे. यापूर्वी शिक्षण सभापती असताना केलेल्या विधायक कार्याचा ही त्यांनी आढावा सादर केला.यावेळी तहसिलदार विक्रम राजपूत,बिलोली शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष गोविंद मुंडकर सचिव विजय कुंचनवार, गटविकास अधिकारी राहटीकर, गटशिक्षणाधिकारी मठपती आदिंची उपस्थिती होती. यावेळी विठ्ठल चंदनकर, अरुण उप्पलवार, शेख फारुख ,मुख्याध्यापक , गटविकास अधिकारी आणि सर्व शिक्षकांनी शाळेच्या व्यथा आणि प्रगतीच्या कथा व्यक्त केल्या. शिक्षणाधिकारी यांनी मुद्देसूद सूचना करून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेची पाहणी केली. लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुद्धा या शाळेला भेट देणार असल्याचे सूचित करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा