न.प येथे स्थापन केलेल्या सी.सी.सी केंद्रात उपचार सुरू
....बसवंत मुंडकर
बिलोली
तालुक्यातील शंकरनगर येथुन जवळच असलेल्या केरूर येथील एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पाँझीटिव्ह आला आहे.सदर रूग्णावर बिलोली नगर परिषदेच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दोन महिन्याच्या अवधिनंतर तालुक्यात कोरोनाचा पाँझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे.प्रशासनाच्या वतीने सयंम बाळगण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
काही दिवसांपुर्वी हैद्राबादहून नांदेड येथे आलेल्या एका व्यक्तीने नांदेड येथील लंगर परिसरात काही काळ व्यथित केला.त्यानंतर नांदेड हून नरसी पर्यंत तीनचाकी अँटोने व नरसी हून बिलोली पर्यंत ट्रक ने प्रवास केलेल्या सदर व्यक्तीस कोरोना सदृष लक्षणे आढळून आल्याने सदर रूग्णास बिलोलीच्या सी.सी.सी केंद्रात दाखल करून त्याची चाचणी करण्यात आली.प्रथम घेण्यात आलेल्या चाचणीत सदर रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता.माञ लंगर परिसरातील काही व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्याने व आपणासही तशीच लक्षणे दिसत असल्यामुळे त्या रूग्णाने स्वतच पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती.रूग्णाच्या म्हणण्या नुसार त्याची दुसऱ्यांदा चाचणी केली असता दुसरा अहवाल पाँझिटीव्ह आला असल्याची माहिती बिलोलीचे ता आरोग्य अधिकारी वाडेकर यांनी दिली. नरसी ते बिलोली पर्यंतचा प्रवास केलेल्या ट्रक चालकासही विलगीकरणात ठेवण्यात आल्याचेही सांगितले.
डाँ.लखमावारांना मुखेडचा अतिरिक्त पदभार,तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी.
बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार यांच्याकडे मुखेड येथील कोव्हीड केअर सेंटरचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.बिलोलीसह मुखेडचा ही अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने डाँ.लखमावार यांना बिलोली व मुखेड अशा दोन्ही ठिकाणी वेळ द्यावा लागत असल्याने गरजेच्या वेळी ते कुठे असतील याचा नेम नाही.त्यामुळे डाँ.नागेश लखमावार यांना बिलोली येथेच पुर्णवेळ काम करू द्यावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
बिलोली त कोव्हिड पाॅझिटिव्ह रुग्णालयात असताना डॉ.लखमावार यांना मुखेडचा अतिरिक्त पदभार देउनये. .
उत्तर द्याहटवाBiloli
हटवाडॉक्टर नागेश जी
हटवाबिलोली येथे गरजेचे आहेत