नायगाव विधानसभा कार्यक्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते मा बालाजी बच्चेवार साहेब एक झंजावात प्रेरणादायी विनम्र नेतृत्व आदर्श व्यक्तिमत्व आहे.
भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष लोकाभिमुख करण्यासाठी ज्यांनी आयुष्याची तीस वर्षे खर्ची घातली नायगाव बिलोलीचा राजकारणात घराणेशाही मोडून काढून एक दबदबा निर्माण करून वैशिष्ट्यपूर्ण कामाचा ठसा उमटवला निष्कलंकीत, निश्चयाचा महामेरू बच्चेवार साहेब एक झांजावात प्रेरणादायी विनम्र नेतृत्व .
अशा आजातशत्रू, विनयशील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आपले योगदान आपला अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज आम्हा नवतरुण कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे आपलं विनयशील नेतृत्व हेच आम्हाला सदैव मार्गदर्शक असणार आहे
आपण नायगाव विधानसभा मतदार संघात मन ,मस्तक आणि, मनगटाच्या बळावर अठरापगड समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नायगाव, बिलोली तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवली.
आज नायगाव विधानसभा क्षेत्रात नावारूपाला आलेली भाजपा तुमच्यासारख्या भूमिपुत्रांचा त्त्याग आणि त्यांच्या समर्पित जीवनाचे प्रतिबिंब होय. तीस वर्ष सतत केलेले कार्याच्या योगदानाची फलश्रुती होय ह्यामुळे आम्हाला तुमचा आज अभिमान आणि हेवा वाटतो.
समर्पित भावनेने आपण केलेलं भरीव कार्य हे कौतुकास पात्र आहे .शेतकरी मजूरदार गरिबांची मुलं कार्यकर्ते म्हणून आपल्या सोबतीला घेऊन पाठच्या भावाप्रमाणे कार्यकर्ते आपल्या जनआंदोलनात सक्रिय केलात त्यातूनच आपण कडवा राजकीय संघर्ष उभा केलात तुमच्या अनवाणी संघर्षाच्या अनेक वेळा राजकीय ठिणग्या पडल्या विरोधकांकडून अनेक वेळा राजकीय द्वेषाने हल्ले झाले, रक्त सांडलं त्या सांडलेल्या रक्तातून, कार्यकर्त्यांच्या घामातून आपल्या निष्कलांकित जीवन प्रवासातून निष्ठेतून उदयास आलेली नायगाव बिलोली क्षेत्रातील भाजपाने अनेक यशाचा पल्ला गाठला
बच्चेवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठे यश म्हणजे भाजपाने उभा केलेल्या जनआंदोलनातून स्वतंत्र नायगाव तालुक्याची निर्मिती झाली ह्यामुळे विरोधकांचे पित्त खवळले नैराश्यातून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ,त्यातून आपणास व जिगरबाज कार्यकर्त्यास तुरुंगवास भोगावा लागला हे केवढं मोठं योगदान आपलं एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून याचा मला रास्त अभिमान वाटतो
तुमच्या पक्षासाठी केलेल्या भरीव निष्काम सेवेचा आवर्जून उल्लेख येथे उल्लेख करावासा वाटतो .
साहेब तुम्ही आमचा आदर्श आहात तुमच्या कार्याच्या उजळयातून आम्हा कार्यकर्त्यास उत्तेजना मिळते. अटल बिहारी वाजपेयी जी ,नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून स्व प्रमोदजी महाजन साहेब स्व गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या कुशीत, सानिध्यात उदयास आलेल्या आमचे नेते बच्चेवार साहेब यांचा सार्थ अभिमान वाटतो
मित्रांनो लोकशाहीच्या महोत्सवात इथे प्रत्येकालाच नेतृत्व करावेसे वाटते आणि आपण नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यायोग्य कालही होतात आणि आजही आहात तो तुमचा हक्क आहे तसे हजारो कार्यकर्त्यांची इच्छा होती बालाजी बच्चेवार विधानसभेत जावे पण नियतीने ते संधी दिली नाही त्यावेळी मन सुन्न झालं आम्ही निशब्द झालो पण.....
बच्चेवार साहेब तुम्ही धीर दिलात पक्षनेतृत्वाने जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे जाहीर रित्या सांगितलात आणि म्हणालात कार्यकर्त्यांनो नाउमेद होऊ नका.
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका ,कारण 'देव "असा डायरेक्टर आहे तो कठीण रोल नेहमी बेस्टएक्टर लाच देतो. बस ह्यापेक्षा काय सांगाव्यात व्यथा बाकी आपण सुज्ञ आहात...
एक मात्र निश्चित आहे भाजपाचा कार्यकर्ता जागोजागी विरोधकांना अडला नडला आणि जोमाने भिडला हे मात्र सत्य आहे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना साहेब आपण म्हणालात
माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या समर्थकांना कार्यकर्त्यांना आवर्जून सांगतो माझ्या उमेदीच्या सुरुवातीच्या काळापासून आपण दिलेले योगदान आपण केलेले समर्थन, आपण माझ्यावर दाखवलैला विश्वास आजवर दिलेली साथ मायेची सावली अशीच राहू द्या तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होणार ,नायगावचा भूमिपुत्र म्हणून कष्टकरी शेतकरी व्यापारी यांना आनंदाचे दिवस दाखवणार, माझ्या पक्ष वाढवण्याच्या कामात या सुरुवातीपासूनच या कठीण काळात तुम्ही कधी नाउमेद झाला नाहीत भारतीय जनता पार्टीचे कार्य म्हणजे राष्ट्रीय कार्य समजून ईश्वरीय कार्य समजून प्रचार प्रसिद्धी चे कार्य सामान्य जनतेची सेवा शेतकऱ्यांचे कार्य आपल्या हातून केलात तुमची ताकद तुमचा विश्वास तुम्हा कार्यकर्त्यांचे बळ बालाजी बच्चेवार च्या सोबत आहे म्हणून मी प्रतिकूल परिस्थितीत भाजपा वाढवली रुजवली आणि गाजवली सुद्धा तुमचं प्रेम तुमची साथ यातूनच जनसेवा करण्याची मिळालेली संधी ह्यातूनच अनेक निवडणुकात दिग्गज विरोधकांना पराभूत केलं घराणेशाही संपुष्टात आणली पक्षाला यश मिळवून दिले येणाऱ्या काळात अजून भरीव कार्य करून तुमचं प्रेम तुमचा विश्वास व्याजासकट परत करेन हा बालाजी बच्चेवार चा शब्द आहे....
मोडला नाही अजून
पाठीचा कणा
पाठिवर हात देऊन
तुम्ही फक्त लढ म्हणा
तुम्ही फक्त लढ म्हणा
अशी कार्यकर्त्यांना तुम्ही साद घातलात याचा आज आनंदाच्या दिनी मुद्दाम उल्लेख केल्यावाचून राहवत नाही
एवढ्या क्रियाशील प्रेरणादायी विनम्र झांजावात नेतृत्वास अफाट उत्साही बहारदार निष्कलंकीत बहुजन नेतृत्वाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा