कासराळी येथील मठाधिपती श्री.ष.भ्र.१०८ निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज यांना सरंक्षण द्या गावक-यांची मागणी
बिलोली (ता.प्र )तालूक्यातील मौजे कासराळी येथील खाकेश्वर मठसंस्थान ट्रस्ट अध्यक्ष मठाधिपती श्री.ष.भ्र.१०८ निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज यांना सरंक्षण द्या अशी मागणी कासराळी येथील गावक-यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे मागणी केली आहे . काही दिवसाखाली उमरी तालूक्यातील नागठाणा येथे मठातील साधुची हत्या झाली त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करुन महाराज अस्थिर झाले आहे.धोक्याचे अंदाज बांधुन पोलीस विभागाच्या वतीने महाराज यांना शस्त्रसह पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन आज दि.30 मे रोजी बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांना देण्यात आले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष मठाधिपती श्री.ष.भ्र 108 निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज,डॉ.के.बी कासराळीकर, गंगाराम चरकुलवार, संग्राम हायगले, इंद्रजीत तुडमे, विशोक चंचलवार ,राजु पा.शिंपाळकर, सय्यद रियाज, दिपक गंगाधर संदलोड, माजीद शेख,लक्ष्मण फुलारी,अदि जन उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा