बिलोली ;-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९५ वी जयंती ३१ मे रोजी सर्वञ साजरी केली जाणार असुन लॉकडाऊनमुळे बिलोली तालूक्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गर्दी होऊ न या उद्देशाने कोरोनाच्या संकटामुळे सार्वञिक जयंत्या रद्द करण्यात आले असुन शासनाच्या आदेशान्वे घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन मल्हार नेते गोविंद मुदगुरे आळंदीकर यांनी केले आहे.
बिलोली तालुक्यातील नागरीकांनी ३१ मे रोजी वेळी १० वाजेच्या दरम्यान आपल्या घरासमोर रांगोळी काढून, घरांवर पिवळा ध्वज उभारुन आपल्या सर्व परिवारासह पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती करावी.पुष्पहारासाठी घरी फुले उपलब्ध असल्यास तयार करा अन्यथा हार आणण्यासाठी बाहेर जाऊ नका असेही सांगण्यात आले.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लाॅकडाऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी सार्वञिक होळकर जयंती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील समाज बांधवांनी या आव्हानाचे पालन करुन सर्वांनी घराघरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करुन सहकार्य करावे असे आवाहन मल्हार नेते तथा देगलुर-बिलोली विधानसभा युवक काँग्रेसचे सहसचिव गोविंद मुदगुरे आळंदीकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा