बिलोली तालुक्यातील नऊ गावातील ३६६१ बाधीत शेतक-याचे अतिवृष्टी व दुष्काळाचे प्रलंबित अनुदान शेतक-यांना तात्काळ वाटप करा; अन्यथा राजु पाटील यांनी दिला उपोषनाचा ईशारा
तालुक्यातील नऊ गावातील ३६६१ बाधीत शेतक-याचे माहे सप्टेंबर /अक्टोंबर मधील अतिवृष्टी नुकसानीची अनुदानीत रक्कम व सन २०१८ मधील तालुका दुष्काळगृस्त घोषित अनुदानीत अर्थिक मदत आद्यापही शासनस्थरावरच प्रलंबित आसल्यामुळे गेल्या आनेक महीण्या पासुन प्रतिक्षेत आसलेल्या शेतक-यांच्या अपेक्षेवर विरजन पडल्याने हवालदिल झालेल्या त्या बाधीत शेतक-यांचे अनुदान तात्काळ वाटप करावे अन्यथा अखिल भारतिय भ्रष्टाचार निर्मुलन समिती व शेतक-यांच्या वतिने आंदोलन,उपोषणाचा ईशारा आज दि.११ जुन रोजी प्रदेश सरचिटणीस राजु पाटील यांनी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.
गत सप्टेंबर/आँक्टोंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मधील पिक नुकसानग्रस्त बाधीत शेतक-यांना तत्कालीन शासनाकडुन आर्थिक मदत म्हणुन प्रति हेक्टरी ८००० हजार रुपये प्रमाणे ०२ हेक्टर मर्यादेनुसार जाहिर करण्यात आलेली अनुदानीत रक्कम सात महिण्याच्या प्रतिक्षे नंतर देखिल सगरोळी,शिंपाळा,टाकळी,खुर्द टाकळी थंडी, तळणी,थडीसावळी,तोरणा,वल्लीयाबाद,येसगी,या ९ गावातील ३६३१ बाधित शेतक-यांचे २ कोटी ८ लाख ९९ हज़ार ३६८ रूपये शासनाकडुन अपेक्षित आसलेली रक्कम आद्यापही महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाली नसुन त्या प्रलंबित अनुदानाच्या प्रतिक्षेत आसलेले शेतक-यांवर कोसळलेले लाँकडाउनचे अर्थिक संकट तसेच तुर्त खरीप पेरणीच्या बि-बियाने ,खतांच्या जुळवा जुळवीच्या अर्थिक संकटकाळी तरी ते प्रलंबित अनुदान शेतक-यांच्या उपयोगी पडतिल या अपेक्षेत होते. परंतु शासनस्थरावरुन या हवालदिल शेतक-याचे प्रलंबित अनुदान आद्यापही तहसिल प्रशासनाकडे प्राप्त झाले नसल्याने आनेक महिण्या पासुन तहसिल कार्यालयाकडे चौकशीचे खेटे मारुन हवालदिल चौकटीत वावरत आसलेल्या या बाधीत शेतक-यांना या प्रलंबित अनुदानासह सन २०१८ मध्ये प्रति हेक्टरी ६८०० रु.प्रमाणे जाहिर करण्यात आलेले दुष्काळी प्रलंबित ते अनुदान देखील त्वरित वाटप करावे अन्यथा दि.१८ जुन रोजी तहसिल कार्यालया समोर आ.भा.भ्र.नि.समिती व शेतक-यांच्या वतिने उपोषण करण्याचा ईशारा प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यानी आज दि.११ जुन रोजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे मार्फत तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या वतिने एका निवेदनाद्वारे करण्यात आले.
Very good
उत्तर द्याहटवा