भाजपा नगराध्यक्षातर्फे आयोजित ईफ्तार पार्टीने हिंदू–मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश.
कुंडलवाडी प्रतिनिधी.
ईस्लाम धर्मातील पवित्र रमजान मास निमित्ताने भारतीय जनतापक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा वतीने येथील के.रामलू मंगल कार्यालय येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.नगरध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या वतीने आयोजित ईफ्तार पार्टीने दिला हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
आयोजित इफ्तार पार्टीत शहरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवले होते.
या कार्यक्रमाचा माध्यमातून समाजात बंधुभाव,एकोपा,धार्मिक एकात्मता आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा तसेच हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश अधिक दृढ व्हावा, हा उद्देश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा, शांतता आणि परस्पर सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक एकत्र येऊन इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते.त्यामुळे कार्यक्रमाला सर्वपक्षीय व सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झाले होते.
या ईफ्तार पार्टीत नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,विद्युत वितरण कार्यालय कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टूवार,शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा नगरसेवक राजेश्वर उत्तरवार,डाॅ.नगरेश बोधनकर,हाफीज वसीम रझा मिसबाही,ईदगाह समितीचे अध्यक्ष सय्यद मंसूर अली,उपाध्यक्ष मोहम्मद अफजल,जामा मस्जिद अध्यक्ष सिराज पट्टेदार,ईदगाह समितीचे सदस्य अ.जावेद हाजी.अ.जलिल,शौकत ईनामदार,शेख अलीम,सैफ खुरेशी,फाजलखान,
शेख सदाम,अब्दूल माजिद,प्रा.यासिन पठाण,शेक अजिम,शेख जावेद टेलर,ईसाख पठाण,जावेद पट्टेदार,खयुम बारूदवाले,जब्बार खान,बबलू रहिम पेंटर,नगरसेवक प्रदीप खेळगे,संजय खुळगे, गंगाधर कोटलावार, मारोती कोटलावार,संजय भास्कर,भीम पोतनकर, सोनू सब्बनवार,शेख मुखत्यार,अजय गट्टूवार नगर परिषद कार्यालय अधिक्षक प्रविण श्रृंगारे,व त्यांचे सहकारी शिंदे कृष्णा,अजय यलगंदकर, हेमचंद्र वाघमारे,प्रकाश भोरे,शंकर जायेवार,जनार्दन भोरे,मारोती करपे,मोहन कंपाळे,धोंडीबा वाघमारे,शुभम ढिलोड,सय्यद माजिद,अंजू कुमार गंटूवार,विजय वाघमारे,साहेबराव वाघमारे सह
विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार करत परस्परांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम कुंडलवाडी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पारपाढला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा