२६ ऑक्टोबर २०१९

डॉ संजीवकुमार जाधव यांची जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय नांदेड व जिल्ह्यात भेटी



नांदेड - डॉ संजीवकुमार जाधव सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे हे दि. २३ ऑक्टो रोजी नांदेड जिल्हात भेट दिली.  जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) व हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड अंतर्गत  आरोग्य सहाय्यक (हत्तीरोग) यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मा.डॉ संजीवकुमार जाधव साहेब यांचे स्वागत मा.डॉ आकाश देशमुख साहेब जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी नांदेड व हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, वरिष्ठ आरोग्य पर्यवेक्षक राजीव पांडे यांनी केले.
.     राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत डेंग्यू, हिवताप व हत्तीरोग कामाचा आढावा घेण्यात आला. *" अंडवृद्धी मुक्त " जिल्हा*  या बाबत शस्त्रक्रिया कँम्पचे नियोजन व *राज्या मध्ये दर मंगळवारी " अंडवृद्धी शस्त्रक्रिया दिवस "* साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील अंडवृद्धी रुग्णांची भेट घेऊन त्यांना नजीकच्या जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रूग्णालय जेथे शस्त्रक्रिया गृह उपलब्ध आहे अशा ठिकाणी अंडवृद्धी शस्त्रक्रिया करून घेण्या करीता रुग्णांना आणण्यात यावे अशी माहिती डॉ जाधव यांनी दिली.
  नियमित लसिकरण कार्यक्रमाचे राज्यस्तरीय पर्यवेक्षण जिल्हा परिषद व मनपा मुख्यालायी करण्यात आले. तसेच तुप्पा ,आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्र व सिडको ,हैदरबाग येथील शहरी केंद्रांची पाहणी करून बालकांचे लसीकरण वाढविणयासाठी बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना विषयी सूचना दिल्या. आरोग्य विभाग जिल्हा परीषद नांदेड व आरोग्य विभाग महानगरपालिका नांदेड येथे सुध्दा भेट दिली व किटकजन्य आजार कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
   यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ बिसेन, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ श्रीमती झीने, सत्यजीत टिप्रेसवार,माणीक गिते, शंकर फोले, व्यंकटेश पुलकंठवार,माधव कोल्हे, गायकवाड, नाईक, पोले, मांचनवाड,चव्हाण, सय्यद, तुम्मोड,उचले, मुंडे, वाखरडकर,गटूवार,मुसळे, शिंदे, हुंबे, बाबशेट्टे,कुलकर्णी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...