१८ ऑक्टोबर २०१९

बिलोली ग्रामीण रुग्णालयाची केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाकडून पाहणी


बिलोली (सय्यद रियाज )- मराठवडा तेलंगाना सीमेवरील लोकांना मापक स्वरूपात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या व सलग तीन वर्ष आनंदीबाई जोशी व कायाकल्प पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयाचे दखल केंद्र पातळीवर घेतली गेली असून शुक्रवारी ता.18/10/2019 केंद्र शासनाचे पथक बिलोलीत दाखल झाले. पथक प्रमुखांनी ग्रामीण रुग्णालयातील सेवासुविधा बघून अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
, बिलोली हा तेलंगणा सीमेलगत असलेला तालुका विकासाच्यादृष्टीने मागास बनत चालला आहे. मात्र तालुका पातळीवर असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील नावीन्यपूर्ण सेवेमुळे रुग्णांचे समाधान होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या या ग्रामीण रुग्णालयाने अल्पावधीत रुग्णांना दर्जेदार सेवा मिळवून दिली. वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त असले तरीही प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डाँ.नागेश लखमावार यांच्यासह कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी  रुग्णांची तत्परतेने काळजी घेत रुग्णालयातील  स्वच्छतेबरोबरच लसीकरण मोहीम, कुटुंब नियोजन कार्यक्रम, माता व बालसंगोपन, नेत्र विभाग, क्ष-किरण विभाग यासह गर्भवती माताची विशेष काळजी घेतल्यामुळे रुग्णालयास सलग तीन वर्ष आनंदीबाई जोशी पुरस्कार व कायाकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
   शुक्रवारी ता.18 केंद्र शासनाच्या पथकाचे प्रमुख व कर्नाटक मधील तज्ञ डाँ. श्रीप्रसाद, अनिल कांबळे, डाँ.एन.ए.हमीद, डाँ.सौ.पाटील आदींनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णालयातील सर्व विभागाची  सूक्ष्म पद्धतीने माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा व त्यांच्यावर केले जाणारे उपचार याचीही माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांपासून सेवकापर्यंत 29 पदे मान्य असून तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 19 कर्मचारी कार्यरत आहेत. वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त असले तरीही प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत असल्याबद्दल पथकाने त्यांच्याही कामाचे कौतुक केले.
  वैद्यकीय अधीक्षक डाँ. नागेश लखमावार, वैद्यकीय अधिकारी डाँ. कैलास शेळके,वैद्यकीय अधिकारी  बालरोगतज्ञ डाँ. सतीश तोटावार,वैद्यकीय अधिकारी डाँ. सुनील कदम,वैद्यकीय अधिकारी डाँ. ज़हिम सिद्धिकी,डाँ.शेख समरीन,डाँ. गव्हाणे,डाँ. मुसळे,डाँ. पूजा भाकरे,डाँ. शेख इर्शाद यांच्यासह कल्पना ठाकूर, होळकर, चव्हाण, घोरपडे, सोहेल, सूर्यवंशी, तळणे,जैरमोड, मोरे, हरनाळीकर, अन्सार, पांचाळ व नाईक या सर्व टीमचे पथक प्रमुख यांनी कौतुक केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...