महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालूका शाखा बिलोलीच्चा नुतन कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,कार्याध्यक्ष मनोहर भंडेवार, जिल्हासरचिटणीस रविंद्र बंडेवार, जिल्हाउपाध्यक्ष गंगाधर ढवळे, अविनाश चिद्रावार, यांच्या उपस्थित हिपरगा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बालाजी गेंदेवाड यांची बिलोली तालुका अध्यक्ष म्हणुन सर्वानूमते निवड करण्यात आली. गेंदेवाड हे अनेक वर्षा पासून शिक्षणासह सामाजीक शेञात देखील चांगल्या प्रकारे काम करत आहेत. या वेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व तालूक्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या वेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा