शिराढोण :-
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे मन्याड भूषण पुरस्कारचे आयोजन कंधार तालुक्याचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होते यामध्ये राज्याच्या व केंद्राच्या सेवेत नुकतेच रुजू झालेल्या गुणवंतांना मन्याड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी लोहा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष देवराव पाटील पांडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पुढे बोलताना पांडागळे म्हणाले कि, मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच याशायाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे .
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास्त चांगले पुस्तक कोठे असू शकते? असे महात्मा गांधी म्हणाले होते खरी समस्या ही आहे की वास्तविक ’शिक्षण’ म्हणजे काय लोकांना ह्याची कल्पना नाही. एखाद्या जमिनीचे किंवा एखाद्या वस्तुचे मोल मोजावे स्टॉक एक्सचेंज बाजारातील आपल्या शेअरचे मूल्यांकन करतो तसे आपण शिक्षणाचे मूल्यांकन करतो. जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते. मात्र शिकलेल्यांच्या चरित्राचा विकास घडविण्याकडे आपण फारच थोडे लक्ष देतो.असे ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार शामसुंदर शिंदे, उद्घघाटक माजी आ.गुरूनाथ कुरूडे,सभापती लक्ष्मीताई घोरबांड,सौ.आशा ताई शिंदे, डॉ. ऋतुराज जाधव,psi मुळे, पानपट्टे साहेब,विक्रांत शिंदे, बालाजी डांगे,अशोक काळम, कमलाकर शिंदे,दत्ता घोरबांड, बालाजी ईसादकर, योगेश नंदनवनकर व सर्व मन्याड भूषण सत्कारमूर्ती, पत्रकार बांधव व परिसरातील नागरिकांची उपस्थित होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा