सगरोळी संस्कृति संवर्धन मंडळ या संस्थेला ६० वर्ष पुर्ण झाल्याने दि.८ फेब्रुवारी रोजी हीरक महोत्सव प.पू.सिध्दराज डाॕ.ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंञी तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंञी मा.ना.अशोकराव चव्हाण
,राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
याच कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे माजी विद्यार्थी ज्ञानराज बाबुराव भेलोंडे ज्ञानसंवर्धन प्रकाशन कोल्हापूर यांनी संस्थेला ६० वर्ष पुर्ण झाल्याने संस्थेची पुस्तकरुपाने तुला केली .यावेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख ,हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख ,दत्तराम खिरप्पा गुरुजी यावेळी उपस्थित होते.
एका माजी विद्यार्थ्यांने संस्थेची पुस्तकरुपाने केलेली तुला अविस्मरणीय असल्याचे अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा