१६ फेब्रुवारी २०२०

भारतीय प्रजासत्ताक पार्टीच्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी मोहन गायकवाड हिब्बटकर यांची निवड...

मुखेड :- भारत सोनकांबळे
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व सबंध नांदेड जिल्ह्यात आपली कणखर भूमिका गाजवत शासन प्रशासनाला समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात धारेवर धरणारे आंबेडकरी चळवळीतील कणखर व धुरंधर नेतृत्व मा.सुरेशदादा गायकवाड यांनी  नुकतेच भारतीय प्रजासत्ताक पार्टीची स्थापना केली आहे. याचाच भाग म्हणून मुखेड तालुक्यात आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी व नवतरुनांना सोबत घेऊन चालणारे युवा नेतृत्व म्हणजे मोहनदादा गायकवाड.मोहन गायकवाड यांनी मुखेड तालुक्यात समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोर्चा तथा आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच धावून जातात. म्हणूनच त्यांची नुकतीच भारतीय प्रजासत्ताक पार्टीच्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
मोहन गायकवाड यांच्या निवडीबद्दल आयु.गंगाधर सोंडारे,डॉ.राहुल कांबळे,भारत सोनकांबळे बेटमोगरेकर,मा.अनिल सिरसे,सिद्धार्थ कांबळे बेळिकर आदीसह सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.
भारतीय प्रजासत्ताक पार्टी म्हणजे बहुजन समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड व आंदोलन व मोर्चाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला जाब विचारत झालेल्या अन्याय अत्याचाराला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणार आहे.भारतीय प्रजासत्ताक पार्टीचे संस्थापक मा.सुरेशदादा गायकवाड यांनी आंबेडकरी चळवळीच्या अनेक शोषित पीडित जनतेला न्याय मिळवून दिला आहे. जनसामान्यांच्या सुख दुःखात नेहमीच धावून जाणारे आंबेडकरी चळवळीतील निर्भीड व धाडशी तसेच धुरंधर अस नेतृत्व म्हणजे सुरेश दादा गायकवाड.  या भारतीय प्रजासत्ताक  पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड पुकारत आंबेडकरी चळवळीला अधिक गतिमान व मजबुतीकरनासाठी लढाऊ आणि आक्रमक भूमिका घेणार असल्याचे वर्तवले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...