पावसाळी अधिवेशनेच्या शेवटच्या दिवशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे माध्यमाशी चर्चा करताना सांगितले की,भाजपाकडे विधानसभेच्या १० जागेची मागणी रयत क्रांती संघटनेसाठी केली आहे.
सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे भाजपाचा मित्र पक्ष आहे.भाजपा -शिवसेना मित्र पक्षाला १८ जागा सोडणार आहे त्यात सदाभाऊ खोत यांनी १० जागेची मागणी केली. इस्लामपूर,शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर,माण, कोरेगाव, फलटण,नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ,उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अशा १० मतदारसंघावर दावा केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा हा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे कार्यक्षेत्र असणारा विधानसभा मतदारसंघ आहे.
पांडुरंग शिंदे हे अनेक वर्षांपासून सदाभाऊ खोत यांच्या सोबत चळवळीत कार्य करत आहेत. पांडुरंग शिंदे हे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रवक्ते,राज्य संघटक असे अनके आणि आता युवा प्रदेशाध्यक्ष अश्या महत्त्वाचे पदावर काम करून राज्यात संघटनेची ताकत वाढविण्यासाठी काम केले आहेत. महिन्या पूर्वी म्हाडा संचालक पदी नियुक्ती करून सदाभाऊ खोत यांनी पांडुरंग शिंदे यांची मतदारसंघात ताकत वाढविण्यासाठी त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे.
पांडुरंग शिंदे हे नायगाव विधानसभेतील मांजरम गांवातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन पुढे येत असलेला कार्यकर्ता आहे. उच्चशिक्षित व स्पर्धा परीक्षेचा काही काळ अभ्यास केल्या कारणाने सामजिक प्रश्नाची अजून जाण असणारा संवेदनशील कार्यकर्ता आहे. त्याची चुणूक आपल्या कार्यातून दाखवली आहे,सदाभाऊ खोत यांच्या मार्फत मतदारसंघात अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केला तसेच गरीब गरजू रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी उपलब्ध करून दिला.शेतकरी, शेतमजूर, विध्यार्थी ,महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत असतात.
नायगाव विधानसभेत भाजपा अंतर्गत गटबाजीला उत आला आहे यांचा फटका पक्षाला बसू शकतो त्याऐवजी रयत क्रांती संघटनेच्या पांडुरंग शिंदे यांना जर सर्वसामान्य व नवीन चेहऱ्याला उमेदवारी दिली तर मतदारसंघात सकारात्मक बदल होईल अशी चर्चा नायगाव विधानसभेत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा