शिराढोण:-प्रतिनिधी
शेतकर्यांना पीकविमा मिळावा, पीककर्ज मिळावे, शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, यासह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी कंधार काँग्रेस पक्षाच्या वतीने कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.कंधार तहसील कार्यालया समोर दि.४ गुरुवारी कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा,सरसकट कर्ज माफी,तात्काळ खरीप हंगामातील पेरण्यासाठी पीककर्ज उपलब्ध करून द्यावी सह इतर मागण्यांसाठी धरणे अदोलन करण्यात आलेतालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे,हम्मीद सुलेमान, रामराव पवार,डॉ शाम तेलंग, संजय भोसीकर, मन्नान चौधरी, अॅड मारोती पंढरे,सुधाकर कांबळे, बाबुराव गिरे, अॅड बाबुराव पुलकंडवार, स्वप्नील लुंगारे, देवराव पांडांगळे, सुरेश कल्हाळीकर, मनोहर चिखलीकर, सतीश देवकत्ते, सतीश नळगे,निरंजन वाघमारे, दत्ता पा शिंदे, बाजीराव पा ताटे, अॅड प्रफुल्ल शिंदे, गणेशराव पवळे, महिंद्र कांबळे, हणमंत कुट्टे, लक्ष्मण केंद्रे, सौ आशाताई गायकवाड, पार्वतीबाई केंद्रे, डॉ बडवणे, विश्वांभर मसलगेकर,ञ्यंबक लाडेकर शेतकरी बांधव उपस्थित होते
आदी उपस्थित होते. तसेच कंधार तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांच्या या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी नांदेड शहर काँग्रेस कमिटी व कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा