बिलोली
कै. बसवंतराव मुंडकर हे चळवळीत घडलेले धाडसी व्यक्ती होते . विद्यार्थिदशेपासून मध्ये त्यांनी विविध धाडसी चळवळी केल्या. ते माझे ज्येष्ठ मित्र होते ते इयत्ता सातवी मध्ये असताना मी इयत्ता चौथी मध्ये जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली येथे शिक्षण घेत होतो. पित्याचे चळवळीचे गुण पुत्राने घेतले असे प्रतिपादन अध्यात्म आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक शामराव जोशी ( इनामदार ) यांनी केले ते बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सहविचार सभेत अध्यक्षपदावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की बिलोली शहरात असलेली ही शाळा ख्यातीप्राप्त होती. मी असेपर्यंत या शाळेला माझ्या उघड्या डोळ्यांनी गतवैभव पाहण्याची इच्छा आहे.
तालुक्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण हल्ली शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे डबघयीला आलेल्या जिल्हा परिषद हायस्कुल शाळेस उर्जीतआवस्था प्राप्त करून देण्यासाठी दि.३० जून रोजी सह विचार सभा घेण्यात आली. यावेळी खगोल शास्त्राचे अभ्यासक तथा सेवानिवृत्त शिक्षक शामराव इनामदार यांनी शाळेच्या विषयाच्या विविध आठवणी व्यक्त केल्या. काही वर्षापुर्वी पर्यंत तालुक्याचे वैभव म्हणून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात बिलोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेने आपली ओळख निर्माण केली होती.सन २००५ नंतर या शाळेकडे शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष अन् तालुक्यातील शिक्षण क्षेञाचे खाजगीकरण होऊन वाढील लागलेल्या काँनव्हेन्ट शाळांमुळे सदर शाळेतील विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस घट होत गेली.वर्षागणिक जिल्हा परिषद हायस्कुल शाळेची होत असलेली अधोगती पाहून बिलोली शहर विकास कृती समिती व शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींचे शाळेच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी एक चळवळ सुरू केली होती.या चळवळीच्या माध्यमातून गत १४ दिवसापासून शिक्षण क्षेञातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना या शाळेच्या समस्यांची माहिती देण्यात आली.कृती समितीच्या सदस्यांनी सुरू केलेल्या चळवळीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या शाळेस भेट देऊन शाळेचा आढावा घेतला. शाळेस उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे अश्वासन दिले.शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींचे या शाळेकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चवळीचा उद्देश साध्य झाल्यामुळे रविवार दि.३० जुन रोजी जिल्हा परिषद हायस्कुल शाळेत घेण्यात आलेल्या शिक्षक व पालकांच्या सह विचार सभेत बिलोली शहर विकास कृती समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या चळवळीचा समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खगोल शास्ञाचे अभ्यासक तथा सेवा निवृत्त शिक्षक शामराव इनामदार यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहूने म्हणून पोलिस निरिक्षक भगवान धबडगे,वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार,माजी नगराध्यक्ष तथा कृती समितीचे सचिव विजय कुंचणवार,शा.व्य समितीचे अध्यक्ष शेख यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात बिलोली शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष तथा चळवळीचे प्रणेते गोविंद मुंडकर यांनी उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी जेष्ठ पञकार हाई पटेल,नगरसेवक अरूण उप्पलवार,सोशल मिडीयाचे प्रतिनिधी सय्यद रियाज यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक पी आर टीकाने , शिक्षक नागनाथ इलेगावे, नाईनवाड, कवठाळे ,शिंदे व पालक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा