२४ सप्टेंबर २०२०

कुंडलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक अंतर्गत शेतक-यांना चार कोटी आठ लाख रुपये पिक कर्ज वाटप

बिलोली प्रतिनिधी ( प्रल्हाद पाटील ).
कुंडलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत या वर्षी कर्जे माफीत आलेले  पाञ  568 शेतक-या पैकी 528 शेतकऱ्यांना कर्जेमाफी  प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा झाले.बाकी 40 शेतक-याचे शिल्लक राहिलेले माफीचे कर्जे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नसुन यात 40 शेतक-याचे खाते ञुटीत आले असुन यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही व काही मयत खातेदार असल्यामुळे कर्जे माफीचे बॅकेत पैसे जमा झाले नाहीत.यामध्ये 223 खातेदार ना मे जुन महिन्यात नवीन कर्जे ही वाटप करण्यात आले आता पर्यंत महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत पिक कर्जे 4 कोटी 8 लाख रुपये कर्ज वाटप शेतक-यांना करण्यात आले आहे त्यामुळे  महाराष्ट्र ग्रामीण बॅक हे   पिक कर्जा साठी    शेतक-यांना एक वरदान   ठरली असुन या बॅके अंतर्गत दहा गावातील शेतकऱ्यांना पिक कर्जे वाटप केले असून  आतापर्यंत 751 शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले आहे. अजुन ही  नविन प्रस्ताव  पिक कर्जासाठी  प्राप्त झाले त्यांचे ही काम प्रगतीपथावर असुन पुर्ण कागदपञे जमा झाले की त्यांना ही पिक कर्जे देण्यात यईल असे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे व्यवस्थापक अब्दुल वाजित यांनी मराठी लाईव्ह न्यूज  तालुका प्रतिनिधींना माहिती दिली 

विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण  बॅकेतील कर्मचारी. बॅक व्यवस्थापक अब्दुल वाजित सर . कॅशियर योगेंद्र चटप सर बॅक आफीसर शुभम होमणे पेंटाजी मिर्झापुरे शेख नजीर यांनी शेतकऱ्यांना आपुलकीने मार्गदर्शन केले आहे महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत इतर बॅंके सारखे कोणतेच दलाल ठेवले नसुन सरळ शेतकरी या बॅकेत मॅनेजर यांना भेटले की पिक कर्जाचे काम तात्काळ होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...