नायगाव (ता.प्र) संभाजी ब्रिगेडची महत्वपुर्ण बैठक नायगाव येथे पार पडली.या बैठकीत नायगाव विधानसभा अध्यक्ष,नायगाव तालुकाध्यक्ष,नायगाव शहराध्यक्ष व इतर विविध पदांची घोषणा करण्यात आली.*
संभाजी ब्रिगेडने गेल्या अनेक वर्षापासुन महाराष्ट्रभर सामाजिक ,शैक्षणीक,शेतकी व युवकांच्या क्षेञात भरीव कार्य केले आहे.येणार्या काळात संभाजी ब्रिगेड १००%समाजकारण १००%राजकारण करणार आहे. असे मत यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी व्यक्त केले.गाव तेथे कार्यकर्ता,गाव तेथे शाखा स्थापन करने हे काम पदाधिकार्यांनी करणे गरजेचे आहे.सरसकट मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करणे हेच खरे आरक्षण ठरेल आसे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांनी मत व्यक्त केले.यावेळी संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्षपदी श्रीधर हंबर्डे,तालुकाध्यक्षपदी श्रीनिवास शिंदे,शहराध्यक्षपदी अविनाश चव्हाण,जिल्हासंघटकपदी शिवराज शिंदे,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी केदार कहाळेकर,तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे,सोशल मिडीया तालुकासचिवपदी अवधुत शिंदे यांची निवड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,जिल्हाध्यक्ष शाम पाटील,मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष प्रा.डाॅ.जीवन चव्हाण,जिल्हाउपाध्यक्ष अभिजीत टाकळे,संभाजी ब्रिगेडचे नेते अनिकेत शिंदे,प्रभाकर ढगे,उमरी तालुकाध्यक्ष योगेश मोरे,यशवंत सेना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लोहगावे आदिंच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा