
नायगाव- कै.व्यंकटराव कवळे पतसंस्थेचे शाखा नायगाव चा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार यांनी काढले गौरवोद्गार आज नायगाव येथे कैलासवासी व्यंकटराव कवळे पतसंस्थेच्या नायगाव शाखेचा चौथा वर्धापन दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर उद्घाटक म्हणून आमदार वसंतराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मारुती रावजी कवळे सर माननीय भगवानराव पाटील भिलवडे एडवोकेट नारायण लंगडापुरे प्राध्यापक जीवन चव्हाण बाबुरावजी गोरठेकर नगरसेवक प्रतिनिधी चंदू चव्हाण उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे शुभेच्छापर भाषणे व मनोगत झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते नायगाव विधानसभेचे प्रमुख दावेदार बालाजी बच्चेवार आपल्या मनोगतात संस्थेचा एकंदरीत व्यवहार व कारभार अत्यंत समाधानकारक व चांगला चालू आहे त्याबद्दल निश्चित मनाला समाधान वाटते संस्थेचे भागभांडवल 86 कोटी रुपये आहे संस्थेने शंभर कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि हे उद्दिष्ट येणाऱ्या काळात ह्या संस्थेला मारोतराव कवळे यांचे नेतृत्व लाभले असल्यामुळे हे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल असा विश्वास वाटतो अशा पद्धतीची भावना यावेळी बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केली यावेळी संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्य चालू असल्याचे मारोतराव कवळे यांनी आपल्या मनोगतातून सांगितल्यानंतर हाच धागा पकडून बालाजी बच्चेवार यांनी ही संस्था सामाजिक उपक्रम बरोबर आपण समाजाचं काही देणं लागतो हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहे ह्या संस्थेने शेतकरी विद्यार्थी व्यवसायिक व्यापारी यांच्याकडे सुद्धा लक्ष दिले आहे या संस्थेच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण सक्षमीकरण व्हावे या दृष्टिकोनातून महिलांच्या बचत गटासाठी शिलाई मशीनच्या व्यवसायासाठी किराणा दुकान चे व्यवसायासाठी कापड दुकान चे व्यवसायासाठी पापड व्यवसायासाठी महिलांना दीड ते दोन लाख रुपयांचे कर्ज सुद्धा यावेळी वाटप करण्यात आले आहे बालाजी बच्चेवार पुढे बोलताना म्हणाले की महिला या व्यवहार चोख पद्धतीने करणारे असतात व हिशोबी असतात त्यामुळे त्या व्यवहारात बरोबर आपला संसार सुद्धा चांगल्या पद्धतीने करत असतात घेतलेले कर्ज हे निश्चितपणे व्यवहारातच ठेवून त्या व्यवहारातून आपल्या कुटुंबाची उपजीविका चांगल्या पद्धतीने महिला राबवतील अशा पद्धतीच्या विश्वास बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केला मात्र पुरुष मंडळी मात्र कर्ज उचलल्यानंतर कर्जाची रक्कम इतरत्र लावतात त्यामुळे सर्व व्यवहार बिघडून जातो अशा पद्धतीची भावना बालाजी बच्चेवार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली ही संस्था मराठवाड्यातील नंबर 1 ची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्य चालू आहे या संस्थेकडे 34 हजार सभासद आहेत ही सभासद संख्या फार मोठी असल्याचे गौरवोद्गार बालाजी बच्चेवार यांनी काढले संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी व संस्था चे कार्य पडावी अशा पद्धतीची भावना बालाजी बच्चेवार यांनी व्यक्ती केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा