शहर परिसरातील नागरीकांनी सहभाग नोंदवावे.
सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचे आवहान.
कुंडलवाडी प्रतिनिधी
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वात
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दि.३१ ऑक्टोबर शुक्रवार
रोजी कुंडलवाडी येथे एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत शहर परिसरातील महिला,पुरूष जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले आहे.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कुंडलवाडी पोलीस स्टेशन तर्फे दि. ३१ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी ७ वाजता कार्ला फाटा रोडवरील नायरा पेट्रोल पंप येथे एकता रॅली चे आयोजन करण्यात आले. पुरूषांसाठी ३ कि.मी. तर महिलांसाठी १.५ दिड किलोमीटर अंतर ठेवण्यात आले आहे. या रॅलीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्यांना आकर्षक सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
या रॅलीत शहरातील सर्वच क्षेत्रातील महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा