महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जून ते २७ जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यभर “वृक्षारोपण मास” साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमाची संकल्पना अभ्यासू शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांची असून, राज्य उपाध्यक्ष विठू चव्हाण , जिल्हाध्यक्ष संतोष पाटील अंबुलगेकर, उपाध्यक्ष शंकर हमंद व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी तसेच शिक्षक सेनेचे बिलोली तालुका सचिव राजाराम कसलोड, उपाध्यक्ष शिवराज गागिलगे, इरेशाम झम्पलकर यांच्यासह तालुका कार्यकारिणीच्या सक्रिय सहकार्याने या उपक्रमास व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ बिलोली तालुक्यातून सर्वप्रथम झाला असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिप्परगाथडी येथील शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदरील वृक्षारोपण हिप्परगाथडी ता.बिलोली,येथील स्मशानभूमी परिसरात करण्यात आले.शिक्षक सेना बिलोली तालुकाध्यक्ष तथा पर्यावरणप्रेमी शिक्षक बालाजी लच्छागोड गेंदेवाड यांच्या पुढाकारातून व प्रभावी मार्गदर्शनातून हा उपक्रम उत्साहात पार पडला.जेष्ठ नागरिक व माजी चेअरमन मा. शेख अहमद साहब यांच्या हस्ते "वटवृक्षाचे रोपण" करण्यात आले,
यावेळी केसराळी केंद्राचे केंद्रप्रमुख नाईक, सूर्यकांत गायकवाड , संजय गायकवाड , रामदास संगेवार , अजय कोंडलवाडे यांसह सर्व शिक्षकवृंद,पोलीस पाटील शंकराप्पा मठपती, सरपंच रहेबर बेग इनामदार, तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव मामडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सय्यद एजाज पटेल, सय्यद हबीब पटेल, शाखाप्रमुख इरफान देसाई, इम्रान पटेल, यादराव पाटील चिन्नोड, विजय भुरे, सय्यद युसूफ साब, अहेमद बेग बाशू बेग, लतीफ पटेल, बाबूसाब हुसेनसाब, राजू तंगनोड यांच्यासह अनेक ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा