२६ जून २०२५

कर्करोग फिरते वाहन द्वारे जिल्ह्यात तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहाचली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांची सुसज्ज फिरती कर्करोग तपासणी व निदान मोबाईल व्हानद्वारे  नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रत्येक तालुक्यात गावोगावे जाऊन कर्करोग्यांद्वारे तपासणी  26 मे ते 23 जून पर्यंत करण्यात आली आहे.जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्ह्यात कर्करोग फिरते वाहन  या शिबिरामध्ये प्रामुख्याने मौखिक कर्करोग स्तन कर्करोग व गर्भाशय मुक्त कर्करोग यांची तपासणी केली  आहे.यासाठी तज्ञ दंतशल्य चिकित्सक व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखालीआरोग्य सेवा तळागाळातील जनतेपर्यंत गावोगावी जाऊन देण्यात आली आहे.

 जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 23 गावांमध्ये हे सगळे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरामध्ये प्रत्येक तालुक्यातील नागरिकांनी भरभरून लाभ घेतला आहे. वाहन गावोगावी गेल्यामुळे जनतेला घरपोच सेवा मिळाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. फिरत्या वाहनामुळे जिल्यात मोठ्या प्रमाणात कर्करोगाविषयी जनजागृती दिसून येत आहे.

 

 तपासलेल्या रुग्णांची संख्या 


1) मुख कर्करोग- 1836

 2) स्तन कर्करोग  -1119

3)  गर्भाशय मुख -   762

       कर्करोग 


Biopsy घेतलेल्या रुग्णांची संख्या


1) मुख कर्करोग -14

2) स्तन कर्करोग -2

3) गर्भाशय मुख कर्करोग  -3

 

 निदान झालेल्या रुग्णांची संख्या 

 

 मुख कर्करोग  -1

 असून रुग्णाला पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. 

-------

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...