२८ जून २०२०

सेवादास माध्यामिक विद्यालय वसंतनगरचे वरिष्ठ लिपिक शेख खादर(के.के) 30 रोजी सेवानिवृत्त


नांदेड (सय्यद रियाज ) सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंत नगर येथील वरिष्ठ  लिपिक के.के. शेख टेंभुर्णीकर हे दि. 30 जून रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.
     के.के शेख यांनी विमुक्त जाती सेवा समिती वसंत नगर ता.मुखेड  या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मारवाडी येथे 1984 रोजी कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यास प्रारंभ केला. त्यानंतर 1992 ला वरिष्ठ लिपिक म्हणून माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी येथे पदोन्नती मिळाली. त्यांचे उत्कृष्ठ कार्य पाहून 1996 रोजी सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंत नगर येथे मुख्य लिपिक म्हणून संस्थेंचे तत्कालीन सचिव स्व. आ. गोविंदराव राठोड यांनी बढती केली. आजपर्यंत  त्यांनी उत्तम पदभार सांभाळला आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्य लिपिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर, विद्यानिकेतन कमळेवाडी, संत ज्ञानेश्वर विद्यालय, संत नामदेव महाराज विद्यालय दापका या शाळेच्या उभारणीत के.के.शेख यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आ आजपर्यंत  त्यांनी उत्तम पदभार सांभाळला आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्य लिपिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर, विद्यानिकेतन कमळेवाडी, संत ज्ञानेश्वर विद्यालय, संत नामदेव महाराज विद्यालय दापका या शाळेच्या उभारणीत के.के.शेख यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे हे. वसंतनगर संकुलाच्या वतीने सोशल डिस्टंस पाळून सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड, सचिव गंगाधर राठोड, आ. डॉ. तुषार राठोड, जि.प. सदस्य संतोष भाऊ राठोड, प्राचार्य हरीदास राठोड, उपप्राचार्य अरुणकूमार थोरवे यांच्यासह शाखा प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...