आज दि. २ नोव्हेंबर रोजी मा.डॉ देशमुख साहेब सहसंचालक आरोग्य सेवा (हिहवज) पुणे यांच्या कडे हिवताप व हत्तीरोग विभागातील प्रलंबित मागण्या बाबत चर्चा करण्यात आली.
१) आश्वासित प्रगती योजना १०, २०, ३० वर्षे चे लाभ दिपावली पर्यंत आदेश देण्यात येणार आहेत.
२) आरोग्य पर्यवेक्षकातून ADMO पदी पदोन्नती देण्यात यावी.
३) आरोग्य सहाय्यकतून आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती देतांना ७५% आरोग्य सहाय्यकातून व २५ % प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या तून सेवा जैष्ठता करण्यात यावी. पदोन्नती देतांना ३:१ प्रमाणे देण्यात यावी.
४) नामकरण आरोग्य कर्मचारी यांचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यक यांचे आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक यांचे आरोग्य विस्तार अधिकारी असे नामकरण करण्यात यावे.
५) क्षेत्र कर्मचारी यांची पदोन्नती आरोग्य कर्मचारी पदी विभागवार जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या कडून लवकरात लवकर करण्यात यावी.
६) हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी हे कोरोना कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांना जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी यांच्या मार्फत कोरोना योध्दा प्रमाणपत्र देण्यात यावे.
७) प्रवास भत्ता देयकांसाठी लवकरच अनुदान देण्यात येईल.
८) आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात यावीत.
९) जिल्हा हिवताप कार्यालयातील लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावीत.
१०) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे प्रलंबित प्रकरणे लवकरात निकाली काढण्यात यावीत.
११) जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालयातील सर्व कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करण्यात यावे.सर्व विषयावर विस्तृत पणे व यशस्वी चर्चा करण्यात आली. वरील सर्व मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल व मान्य करण्यात येईल असे आश्वासन मा.देशमुख साहेब सहसंचालक पुणे यांनी संघटनेला दिले.*
⚡तसेच पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सब ऑर्डिनेट असोसिएशन पुणे यांच्या संपाला पाठिंबा देण्यात आला.*
*यावेळी मा.बाजीराव कांबळे राज्याध्यक्ष, मा.पी.एन.काळे राज्य सरचिटणीस, सुनील साखरे बीड राज्य उपाध्यक्ष, सत्यजीत टिप्रेसवार राज्य कोषाध्यक्ष नांदेड, जगदीश गोपाळे पुणे, निरंजन चिकटे राज्य कार्याध्यक्ष नागपूर, संभाजी कोकडे, गणेश पारखी, गजानन ईटकर झपुणे, अशोक ढवळे, देविदास पेंढारकर नांदेड, राहूल आटोळे अमरावती, गजानन शिळे चंद्रपूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.*
हतिरोग विभागात नियमीत क्षेत्र कर्मचारी वर्ग - ड यांची भरलेली पद्दे 400 ते 500 च्या आसपास आहेत
उत्तर द्याहटवा