कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण मोहीम अंतर्गत भोकर येथे डॉ अविनाश वाघमारे निवासी वैद्यकीय अधिकारी यांची भेट
भोकर - संपूर्ण महाराष्ट्रात कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून भोकर शहर अंतर्गत डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शेख फरीद नगर भागातील नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येत आहेत.
आज दि.१२ डिसेंबर रोजी डॉ अविनाश वाघमारे निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड यांनी भेट दिली, सर्वेक्षण पाहणी केली, सुचना व मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक भोकर, सचिन कोंडबत्तेवार नांदेड, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, पांडुरंग तम्मलवाड, गणेश गोदाम आरोग्य कर्मचारी, शिल्पा खंडागळे स्वयंसेविका उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा