कंधार (ता.प्र) तालुक्यातील मौजे भुकमारी येथील माजी सरपंच सय्यद अहेमदसाब यांचे वयाच्या १०२ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. भुकमारी येथील ग्रामपंचायत येथे सरपंच म्हणून सतत 20 वर्षे कारभार सांभाळले.दि 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता निधन झाले. त्यांची दफन वीधी दि 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2, वाजता गावातील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. गावात सर्वात जास्त वयाचे ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले,दोन मुली,नातु नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सय्यद नबी, सय्यद अब्दुल, सय्यद जमाल, सय्यद बशीर यांचे ते वडील होत.