नायगाव मौजे सालेगाव येथील रस्त्याच्या मागणीसाठी बसलेल्या युवकांचे पोषण नायगावचे तहसिलदार सुरेखा नांदे भारतीय जनता पार्टीचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते बालाजी बच्चेवार व यांच्या हस्ते सोडण्यात आले यावेळी उपोषणासाठी बसलेले
माधव पाटील जाधव शंकर पाटील जाधव . दिगंबर झुंबडे राजेश्वर पाटील जाधव संतोष मनुरे रंगराव लव्हाळे शेख अझर हे सात तरुण कालपासून उपोषणास बसले होते यावेळी गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी या गावच्या तलाठी यांच्याविषयी बऱ्याच लोकांनी तक्रार केली त्या संदर्भात तहसीलदार यांनी तात्काळ तलाठी यांची बदली करण्याचे मी लगेच आदेश निर्गमित करेल अशा पद्धतीच्या आश्वासनही उपोषणार्थि युवकांना दिलं पूर्वी चालू असलेले दोन अधिग्रहण आता एक वाढून तीन करण्यात येतील व टंचाई दूर करण्यात येईल हेही त्यांनी सांगितलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री पाटील साहेब यांनी लिखित स्वरूपात उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घ्यावेत रस्त्याचं काम सुरुवात केलेली आहे मुरूम आणि खडीकरण रस्त्यावर येऊन पडत आहे त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे अशा पद्धतीचे विनंती पत्र यावेळी दिल्या यानंतर सर्व गावकरी समक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते व नांदे मॅडम यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले यावेळी बालाजी बच्चेवार बोलताना म्हणाले की आजपर्यंत या रस्त्याचा प्रश्न सुटायला हवा होता परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा रस्ता या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याला लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले येणाऱ्या काळात या भागातील नायगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्ते माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्फत देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून मंजूर करून घेण्यात येऊन सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने करण्यात येतील हेही त्यांनी प्रामुख्याने नमूद केले पुढे बोलताना बच्चेवार म्हणाले की शेवटच्या घटका लोकांचा विकास झाला पाहिजे लोकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजेत यासाठी तहसीलदार यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना विनाविलंब काम करण्याच्या सूचना द्याव्यात व त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घ्यावी अशा पद्धतीची सूचना यावेळी बालाजी बच्चेवार यांनी आपल्या मनोगतात केली सर्व उपोषण कर्त्या तरुणांनी विनंतीला मान देऊन उपोषणाची समाप्ती केली यावेळी गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपोषण आर्थिकडे या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार यांचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा