२० जुलै २०१९

बहुजन रयत पार्टी नांदेड जिल्हा सचिव पदी गजानन दावरशेट्टीवार व बालाजी आरकटवार यांची निवड




नांदेड:-(प्रतिनिधी)
पद्मशाली समाजाच्या सामाजिक जागृतीसाठी संपूर्ण तालुक्यात नाव असलेले तथा सामाजिक जागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते गजानन दावरशेट्टीवार (रा. कुंभारगाव ता,बिलोली जिल्हा नांदेड) यांची बहुजन रयत पार्टीच्या नांदेड जिल्हा सचिव पदी निवड तर जिल्हा सरचिटनिस पदी बालाजी आरकटवाड यांची निवड बहुजन रयत पार्टीचे महासचिव महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते भोकर येथील विश्राम गृहात झाली.धर्माबाद ता.अध्यक्ष पदी अविनाश भिम्रतवार तर बिलोली ता.अध्यक्ष पदी शेळके यांची निवड करण्यात आली यावेळी अनेक महत्वाची पदे नांदेड जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्ते यांना करण्यात आले.आगामी विधानसभेत बहुजन रयत पार्टी संपूर्ण २८८  जागा लढवणार असल्याचे बहुजन रयत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन कळवले होते त्यानंतर अनेक जण पक्ष प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते म्हणून प्रवेश सुद्धा अनेकांनी  केला आहे.यावेळी संजय नाईकडे(कार्याध्यक्ष, नांदेड),मा.रवी गेंटेवार(नांदेड जिल्हा उपाध्यक्ष),बालाजी चारलेवाड,दुर्गेश्वर वाघमारे आदींची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...