नायगांव विधानसभा मतदारसंघातील पिकविम्याचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी बालाजी बच्चेवारांची यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंञी ना.चंद्रकांत पाटील यांच्या कडे केली मागणी
.
नायगांव बा.
नायगांव विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील पिकविम्याचा प्रलंबित प्रश्न सोडवून दुष्काळाच्या गर्तेत असलेल्या शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुलमंञी ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे भाजपाचे युवानेते बालाजी बच्चेवार यांनी आज मुंबई येथे भेटीत केली.भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसुलमंञी ना.चंद्रकांतदादा पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याने नायगांव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवानेते तथा मा.जि.प.सदस्य बालाजी बच्चेवार यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन अभिनंदन करुन आगामी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर,नायगांव मतदारसंघातील भाजपा पक्ष संघटन तसेच,या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.यावेळी शिवाजी पा.वडजे यांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी ना.चंद्रकांतदादा पाटील यांना बालाजी बच्चेवार यांनी महत्वाच्या पिकविम्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तसेच,या भागातील जनसमस्यांवर लक्ष देण्याच्या व त्यांच्या निवारणासाठी आग्रह केला.या प्रकरणांत आपण निश्चित लक्ष देऊ असे अभिवचन देऊन सकारात्मक प्रतिसाद ना.पाटील यांनी दिला.
दरम्यान भाजपा संघटनमंञी आ.सुजितसिंह ठाकूर यांचीही आज भाजपा युवानेते बालाजी बच्चेवार यांनी भेट घेतली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा