मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धोकेबाज निघाली गाणं समाज माध्यमावर घालतोय धुमाकूळ

  तालूक्यातील अटकळी येथील रिल स्टार साजीद शेख यांचं धोकेबाज निघाली हे गाणं सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर धूमाकूळ घालत आहे गाण्याचं तरुणात या गाण्यानं भलतंच वेड लावलय साजीद शेख हे अटकळी येथील गोरे मिया साब शेख यांचा मुलगा आहे अंत्यंत गरीब कुटुंबातील भुमीहीन शेतमजुराचा मुलगा आहे घरची परिस्थिती हलाखीची आहे लहान पणापासूनच गाण्याची आवड आहे लावणी भारुड गोंधळ अभिनय संगीत अशा अनेक कलेमध्ये चांगले काम करत आहे. अनेक जीवनापासून तो समाज माध्यमावर वेगवेगळे रील्स तयार करत आहे यातच इंजीनियर सचिन भद्रे लिखित धोकेबाज निघाली या गाण्याचं चित्रीकरण झालं असून हे गाण्यात मुख्य भुमिका साजीद शेख व प्रगती वाढे आणि सूयोग इंगोले यांने साकारली सध्या तरुणांचा समाज माध्यमावरील पाऊल खुणा या युट्यूबवर हे गाणं भलतंच धूमाकूळ घालत आहे या गाण्यामुळे अटकळी गावचे नाव साजीद शेख यांने रोषण केलं साजीद शेख यांचा सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

पद्मशाली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाज भूषण पुरस्कार प्रदान

  नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड  येथे  200 गुणवंत विद्यार्थी सत्कार, 30 नवनियुक्त,15 पदोन्नत - 15 सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.      सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय  तुळशीदास भुसेवार अध्यक्ष गोदावरी सोसायटी नांदेड , स्वागताध्यक्ष राजेश यन्नम मा. नगरसेवक   नांदेड वाघाळा महानगरपालीका, विशेष अतिथी प्रसिद्ध विधिज्ञ ॲड.डॉ.रामदास सब्बन प्रसिद्ध वकील मुंबई  हायकोर्ट, प्रा. बालाजी कोंपलवार माजी उपप्राचार्य तथा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य,  प्रकाशभाऊ मारावार महानगर प्रमुख शिवसेना नांदेड, उद्योजक विजय भंडारे संचालक भवानी ऍग्रो प्रा. ली. हैद्राबाद, विजय कुरुंदकर कार्यकारी अभियंता नांदेड, ईश्वर येमुल दि. टाऊन मार्केट सोसायटी नांदेड, रोहितसेठ ( शास्त्री) अडकटलवार अध्यक्ष महाराष्ट्र युनायटेड पद्मशाली संघम हैद्राबाद, जगन्नाथ बिंगेवार अध्यक्ष मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम हैद्राबाद,  महेंद्र दासरवार सचिव मराठवाडा ...

“वृक्ष लावा, जीवन वाचवा” या मंत्राने हिप्परगाथडी येथे पर्यावरण जागृतीचा संकल्प

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जून ते २७ जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यभर “वृक्षारोपण मास” साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमाची संकल्पना अभ्यासू शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष  ज.मो. अभ्यंकर यांची असून, राज्य उपाध्यक्ष विठू चव्हाण , जिल्हाध्यक्ष संतोष पाटील अंबुलगेकर, उपाध्यक्ष शंकर हमंद व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी तसेच शिक्षक सेनेचे बिलोली तालुका सचिव राजाराम कसलोड, उपाध्यक्ष शिवराज गागिलगे, इरेशाम झम्पलकर यांच्यासह तालुका कार्यकारिणीच्या सक्रिय सहकार्याने या उपक्रमास व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. या उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ बिलोली तालुक्यातून सर्वप्रथम झाला असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिप्परगाथडी येथील शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदरील वृक्षारोपण हिप्परगाथडी ता.बिलोली,येथील स्मशानभूमी परिसरात करण्यात आले.शिक्षक सेना बिलोली तालुकाध्यक्ष तथा पर्यावरणप्रेमी शिक्षक बालाजी लच्छागोड गेंदेवाड यांच्या पुढाकार...

कर्करोग फिरते वाहन द्वारे जिल्ह्यात तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहाचली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांची सुसज्ज फिरती कर्करोग तपासणी व निदान मोबाईल व्हानद्वारे  नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रत्येक तालुक्यात गावोगावे जाऊन कर्करोग्यांद्वारे तपासणी  26 मे ते 23 जून पर्यंत करण्यात आली आहे.जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्ह्यात कर्करोग फिरते वाहन  या शिबिरामध्ये प्रामुख्याने मौखिक कर्करोग स्तन कर्करोग व गर्भाशय मुक्त कर्करोग यांची तपासणी केली  आहे.यासाठी तज्ञ दंतशल्य चिकित्सक व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखालीआरोग्य सेवा तळागाळातील जनतेपर्यंत गावोगावी जाऊन देण्यात आली आहे.  जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 23 गावांमध्ये हे सगळे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरामध्ये प्रत्येक तालुक्यातील नागरिकांनी भरभरून लाभ घेतला आहे. वाहन गावोगावी गेल्यामुळे जनतेला घरपोच सेवा मिळाली आहे त्यामुळे नागरिकांम...