देगलूर ६ डिसेंबर १९९२ रोजी स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे समाजकंटकांकडुन पवित्र स्थळ बाबरी मस्जीद पाडण्यात आली.देगलूर शहरातील सर्व मुस्लीम बांधवांकडुन या दुर्दैवी घटनेचा निषेध करून या मागील समाजकंटकांना तात्काळ शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी देगलूर मार्फत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनास देण्यात आले.निवेदन देतांना तन्जीम आईमा मस्जीद या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती अहेमद खासमी,मौलाना हनिफ,हाफीज अय्युब ,हाफीज अकबर ,हाफीज जिलानी,मोहमद अल्ताफ पत्रकार, इब्राहीम खाँन,शोऐब शहापुरकर ,हमीद शहापुरकर ,लियाकत अली,शेख इम्रान ,फायख खुरेशी ,जावेद अहेमद व इतर उपस्थित होते.
बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....! बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!! मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा